
Prithvi Shaw Excluded From Mumbai Squad: मुंबई आणि भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला रणजी ट्रॉफी 2024 (Ranji Trophy 2024-2025) च्या तिसऱ्या साखळी सामन्याआधी मुंबई संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट संघटनेने (Mumbai Cricket Association) फिटनेस आणि शिस्तीतील अनियमितता या कारणांनी त्याला वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता त्याच्या कारकिर्दीविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
Prithvi Shaw left out of Mumbai Ranji Squad due to discipline and fitness issues..!!!!
– Prithvi Shaw has been inconsistent in attending practice sessions and he is also believed to be overweight. (Cricbuzz). pic.twitter.com/SS90fRdZFi
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 22, 2024
रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यात पृथ्वी याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. चार डावात मिळून तो फक्त एक अर्धशतक झळकावू शकला होता. मात्र, या व्यतिरिक्त फिटनेसची त्याची समस्या असल्याचे संघटनेने सांगितले. त्याचा बॉडी फॅट 35 झाला असून, त्यामुळे त्याची हालचाल मंदावल्याचे सांगण्यात येते.
यासोबतच त्याची वर्तणूक ही एका व्यावसायिक क्रिकेटपटूला साजेशी नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासगीत म्हटले. तो संघाच्या सराव सत्रात फारशा गांभीर्याने सराव करत नाही. तसेच, तो अनेक वेळा सराव सत्रांना दांडी देखील मारतो. अनेक वरिष्ठ खेळाडू सराव सत्रात हजर असताना, त्याचे असे वागणे संघटनेला खटकल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी कमीत कमी एका सामन्यासाठी बाहेर करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
‘बर्थ डे बॉय’ Sarfaraz Khan बनला बाबा! वाढदिवसाची मिळाली मौल्यवान गिफ्ट
पृथ्वी हा त्याच्या खेळापेक्षा मैदानाबाहेरील गोष्टीमुळे नेहमी चर्चेत राहतो. मागील वर्षी एक पबमध्ये झालेले भांडण चांगले चर्चेत आले होते. तसेच, त्याआधी देखील ड्रेसिंग रूममध्ये इतर खेळाडूंशी त्याचे वाद झाले होते. आगामी आयपीएलआधी दिल्ली कॅपिटल्स त्याला रिटेन करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लिलावात त्याला किती किती किंमत मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
(Prithvi Shaw Excluded From Mumbai Squad)