Breaking News

तूच खरा हिटमॅन! Rohit Sharma ने IPL 2025 Eliminator मध्ये केले दोन अद्वितीय कारनामे

rohit sharma
Photo Courtesy: X

Rohit Sharma Touch Milestone In IPL: आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स (MIvGT) यांच्या दरम्यान एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांनी तुफानी फटकेबाजी केली. यादरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

Rohit Sharma Hits 300 Sixes In IPL

डू ऑर डाय अशा असलेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हंगामातील पहिला सामना खेळत असलेल्या जॉनी बेअरस्टोने सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारले. तर, दुसऱ्या बाजूला रोहितला दोन जीवदान मिळाली. दोघांनी मिळून 84 धावांची भागीदारी केली. बेअरस्टोने 22 चेंडूंवर 47 धावा केल्या. यामध्ये तीन षटकार व चार चौकार सामील होते.

संथ सुरुवातीनंतर रोहितने मोठे फटके खेळत केवळ 28 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. आपल्या डावातील दुसरा षटकार मारताना त्याने आयपीएल इतिहासात 300 षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी केवळ ख्रिस गेल (Chris Gayle) यानेच हा टप्पा पार केला आहे‌. गेलच्या नावे आयपीएलमध्ये 357 षटकार आहेत. तर, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याने 291 षटकार ठोकलेले आहेत.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

या विक्रमासोबतच रोहितने आयपीएल कारकीर्दीत 7000 धावा देखील पूर्ण केल्या. त्याच्यापुढे आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा काढण्यात आता केवळ विराट कोहली आहे. विराटच्या नावे 8618 आयपीएल धावा जमा आहेत.

(Rohit Sharma Hits 300 Sixes In IPL)

हे देखील वाचा: इ साल कप नमदे! तब्बल 9 वर्षांनी RCB आयपीएल फायनलमध्ये, पंजाबची क्वालिफायरमध्ये शरणागती

लखपती बनायचंय का? MPL 2025 पाहायला जा, वाचा सविस्तर