
Who Is Aaron Jones|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेला रविवारी (2 जून) सुरुवात झाली. डेल्लास येथे यजमान युएसए आणि कॅनडा (USAvCAN) यांच्या दरम्यान पहिला सामना खेळला गेला. यूएसए संघाने सात गडी राखून 195 ही मोठी धावसंख्या सहज पार केली. त्यांच्या या ऐतिहासिक विजयात मधल्या फळीतील फलंदाज ऍरॉन जोन्स (Aaron Jones) याचा सिंहाचा वाटा राहिला. मात्र, हा जोन्स नक्की कोण? अशी चर्चा रंगली आहे.
Tied second-most sixes (10) in a Men's #T20WorldCup innings 🔥
USA's Aaron Jones was unstoppable in Dallas.
Innings highlights ➡️ https://t.co/ulSEtdFGC6 pic.twitter.com/yA0vs74XbV
— ICC (@ICC) June 2, 2024
कॅनडाच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी करत 194 अशी मोठी धावसंख्या उभी केली होती. आपला पहिलाच विश्वचषक खेळत असलेल्या युएसए संघाकडून धावसंख्या पार होणार का याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. मात्र, संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज असलेल्या ऍरॉन जोन्स (Aaron Jones 94) याने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या जोन्स याने फक्त 22 चेंडूंमध्ये विश्वचषकातील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 18 व्या षटकात संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहताना फक्त 40 चेंडूंमध्ये 4 चौकार व 10 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 235 असा तगडा राहिला.
या खेळी दरम्यान तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एका डावात दहा षटकार ठोकणारा पहिला फलंदाज बनला. तसेच, टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सहयोगी देशांसाठी सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा मान त्याने युएसएला मिळवून दिला.
जोन्स हा सध्या 29 वर्षाचा असून, तो बार्बाडोस येथे जन्माला आहे. त्याचे पालक न्यूयॉर्क येथे स्थायिक असल्याने तो अमेरिकेसाठी खेळण्यास पात्र ठरला. त्याने काही काळ बार्बाडोसमध्ये क्रिकेट खेळले. विशेष म्हणजे इंग्लंडचा सध्याचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा त्याचा जवळचा मित्र आहे. जॉन्सने 2017 पासून बार्बाडोसमध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. त्यानंतर 2019 मध्ये तो अमेरिकेसाठी खेळण्यास पात्र ठरला. त्याच वर्षी त्याने शानदार कामगिरी करत यूएसए संघाला वनडे क्रिकेटचा दर्जा मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने 43 वनडे सामन्यात 1454 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक व दहा अर्धशतके सामील आहेत. तसेच 27 टी20 सामन्यात 478 धावा त्याने केल्या. मेजर लीग क्रिकेटमध्ये तो सिएटल ओरकास संघाचे प्रतिनिधित्व करतो. पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या जबरदस्त फलंदाजीचे दर्शन घडवल्यानंतर, उर्वरित विश्वचषकातही त्याच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा युएसए संघ करेल.
(Who Is Aaron Jones Who Hits 10 Sixes In T20 World Cup 2024 Opener Against Canada)
I’m still learning from you, as I’m improving myself. I absolutely enjoy reading everything that is written on your site.Keep the tips coming. I loved it!
fascinate este conteúdo. Gostei bastante. Aproveitem e vejam este conteúdo. informações, novidades e muito mais. Não deixem de acessar para descobrir mais. Obrigado a todos e até a próxima. 🙂
I have not checked in here for some time as I thought it was getting boring, but the last few posts are great quality so I guess I¦ll add you back to my everyday bloglist. You deserve it my friend 🙂
Excellent blog here! Also your website loads up fast! What web host are you using? Can I get your affiliate link to your host? I wish my website loaded up as fast as yours lol
Regards for helping out, great info. “Job dissatisfaction is the number one factor in whether you survive your first heart attack.” by Anthony Robbins.
I’d forever want to be update on new articles on this website , bookmarked! .
Real excellent info can be found on web blog. “The only thing you take with you when you’re gone is what you leave behind.” by John Allston.
I¦ve recently started a website, the info you offer on this website has helped me greatly. Thanks for all of your time & work.
Generally I do not read article on blogs, but I wish to say that this write-up very compelled me to take a look at and do it! Your writing taste has been amazed me. Thanks, very nice post.