Breaking News

Wimbledon 2025 च्या विजेत्यावर पैशाचा पाऊस, मिळणार आयपीएल विजेत्यांपेक्षाही तगडी रक्कम

WIMBLEDON 2025
Photo Courtesy: X

Wimbledon 2025 Prize Money: वर्षातील तिसरी आणि सर्वात जुनी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनला रविवारी (30 जून) सुरुवात होईल. दोन आठवडे चालणाऱ्या या मानाच्या स्पर्धेसाठी एकूण बक्षिस रकमेत वाढ करण्यात आली आहे. स्पर्धेचे आयोजक असलेल्या ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

Wimbledon 2025 Prize Money Increased

एईएलटीसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विम्बल्डन 2025 च्या बक्षिस रकमेत 7 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या कारणाने ही रक्कम तब्बल 623 कोटी इतकी झाली. त्यामुळे पुरुष व महिला एकेरीतील विजेत्याच्या बक्षिसात 11 टक्क्यांनी भर पडेल. दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी 35 कोटी रुपये ग्रँडस्लॅम ट्रॉफीसोबत देण्यात येतील. क्रिकेटच्या तुलनेत ही रक्कम अधिक आहे. आयपीएल विजेत्या आरसीबी संघाला केवळ 20 कोटी रुपये मिळाले होते. तर, नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप विजेत्या दक्षिण आफ्रिका संघाला 30 कोटी रुपये देण्यात आलेले.

विम्बल्डनमध्ये उपविजेत्या खेळाडूला 17.71 कोटी रुपये मिळतील. तर, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूंना देखील नऊ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे. तसेच पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतरही, एकेरीतील खेळाडू प्रत्येकी 76 लाख रुपये घेऊन जातील. दुहेरी आणि मिश्र दुहेरीतील खेळाडूंना देखील वाढीव मानधन मिळणार आहे.

स्पर्धेबाबत बोलायचे झाल्यास, पुरुष एकेरीत कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. त्याला अनुभवी नोवाक जोकोविच, ऍलेक्झांडर झेरेव व यानिक सिन्नर हे आव्हान देताना दिसतील. तर, महिला एकेरीत कोको गॉफ, क्रेजिकोवा, इगा स्वियाटेक व विक्टोरिया अझारेंका यांच्यापैकी विजेती होऊ शकते.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: T20 World Cup 2024 Triumph: वर्षपूर्ती टीम इंडियाच्या विश्वविजयाची, न विसरता येणाऱ्या आठवणींची