Breaking News

अशी रंगणार WWE Night Of Champions 2025, भारतात कोठे पाहता येणार? वाचा सर्वकाही

wwe night of champions 2025
Photo Courtesy: X

WWE Night Of Champions 2025: डब्लूडब्लूई (WWE) मधील महत्त्वाचा दिवस म्हणजे डब्लूडब्लूई नाईट ऑफ चॅम्पियन्स 2025 सुरू होत आहे. यामध्ये डब्लूडब्लूईमधील अनेक बडे सितारे दिसून येतील. भारतात शनिवारी (28 जून) रात्री हे सामने प्रक्षेपित होतील.

WWE Night Of Champions 2025 Schedule

जगातील सर्वात मनोरंजक खेळांपैकी एक असलेल्या डब्लूडब्लूईमध्ये नाईट ऑफ चॅम्पियन्स या दिवसाचे विशेष महत्त्व असते. यंदा सौदी अरेबिया येथील रियाध येथे हे सामने होतील. हे या इव्हेंटचे 11 वे वर्ष आहे. यावेळी स्पर्धेत सहा प्रमुख सामने होतील.

1) जॉन सीना (John Cena) विरुद्ध सीएम पंक (CM Punk)- अनडिस्पुटेड डब्लूडब्लूई चॅम्पियन

2) रॅंडी ऑर्टन विरुद्ध कोडी रोड्स- किंग ऑफ द रिंग फायनल

3) जेकब फाटू विरुद्ध सोलो सिकोवा- युनायटेड स्टेट चॅम्पियन

4) असूका विरुद्ध जेड कारगिल- क्वीन ऑफ द रिंग

5) रिया रिपली विरुद्ध राकेल रॉड्रिग्ज- स्ट्रीट फाईट

6) सॅमी झियान विरुद्ध केरीसन क्रॉस

भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सामने 28 जून रोजी रात्री 11 वाजता सुरू होतील. भारतात हे सामने केवळ नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना पाहता येणार आहेत.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: Yash Dayal Accused Of Sexual Harrasment: आरसीबीच्या युवा गोलंदाजावर महिलेचे गंभीर आरोप, थेट योगी आदित्यनाथांकडे मागितला न्याय