Breaking News

UFC च्या रिंगमध्ये फडकला तिरंगा! Puja Tomar ने जिंकली ऐतिहासिक फाईट, म्हणाली, “जगाला दाखवून दिले की…”

puja tomar
Photo Courtesy: X/DD News

Puja Tomar Won UFC Bout| भारताची फायटर पुजा तोमर (Puja Tomar) हिने अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (UFC) मध्ये इतिहास रचला आहे. ती युएफसी लढत जिंकणारी पहिली भारतीय बनली. UFC लुईव्हिल 2024 मध्ये ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा तिने पराभव केला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या पूजाने गेल्या वर्षी युएफसीसोबत करार केला होता. हा करार करणारी ती पहिलीच भारतीय होती. महिला स्ट्रॉवेट विभागातील तिच्या पदार्पणाच्या लढतीत तिने 30-27, 27-30 आणि 29-28 अशा गुणांसह स्प्लिट डिसिजनद्वारे विजय मिळवला.

हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही खेळाडूंनी आपली ताकद या लढतीत आजमावली. पुजाने पहिल्या फेरीत शक्तिशाली बॉडी किक्ससह वर्चस्व राखले. या किक डॉस सँटोसवर अगदी योग्य ठिकाणी लागल्या. त्यानंतर तिने असाच आक्रमक खेळ करत आपला विजय निश्चित केला.

या विजयानंतर बोलताना ती म्हणाली, “हा विजय माझ्या एकटीचा नाही. हा विजय सर्व भारतीय चाहत्यांचा आणि सर्व भारतीय फायटर्सचा आहे. आधी प्रत्येकाला वाटायचे की भारतीय फायटर्स कुठेच नसतात. त्यामुळे मला जगाला दाखवायचे होते की, भारतीय फायटर लूजर्स नाहीत.”

युएफसीजगतात ‘सायक्लॉन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 30 वर्षीय पुजाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युएफसीसोबत करार केला होता. यासह ती सर्वात मोठ्या मिश्र मार्शल आर्ट्स प्रमोशनमध्ये भाग घेणारी भारतातील पहिली महिला बनलेली. पुरुष विभागात यापूर्वी अंशुल जुबली (Anshul Jubli) आणि भरत कंधारे (Bharat Kandare) यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

(Puja Tomar Makes History After Won UFC Bout)

One comment

  1. I am now not sure where you’re getting your information, however good topic.
    I needs to spend a while learning much more
    or figuring out more. Thanks for magnificent info
    I used to bbe on thhe lookout for this info for my mission. https://glassi-info.blogspot.com/2025/08/deposits-and-withdrawals-methods-in.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *