Breaking News

Smriti Mandhana Century: सलग दुसरे वनडे शतक ठोकत मंधानाने रचला इतिहास, मिताली राजचीही केली बरोबरी

Smriti Mandhana Back To Back ODI Century:- बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मंधाना हिने (Smriti Mandhana) शतकी खेळी करत विक्रमांचा ढीग रचला आहे. सलग दुसऱ्या वनडे सामन्यात शतक ठोकत स्मृतीने माजी भारतीय कर्णधार मिताली राजच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर स्मृतीने १२० चेंडूत १३६ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान तिने २ खणखणीत षटकार आणि १८ चौकार मारले. चिन्नास्वामी स्टेडियमवर तसेच दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध स्मृतीचे हे वनडेतील सलग दुसरे शतक होते. यापूर्वी पहिल्या वनडेत तिने ११७ धावा फटकावल्या होत्या. अशाप्रकारे सलग दोन वनडे शतके करत स्मृतीने इतिहास रचला आहे. भारतीय महिला क्रिकेटमध्ये सलग दोन वनडे शतके करणारी ती पहिली आणि एकमेव फलंदाज ठरली आहे.

तसेच हे स्मृतीने वनडेतील सातवे शतक होते. यासह भारताकडून वनडेत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या विक्रमात तिने माजी भारतीय कर्णधार मिताली राजची बरोबरी केली आहे. मितालीने २११ डावात वनडेत सर्वाधिक ७ शतके केली होती. तर स्मृतीने केवळ ८४ डावात हा मानाचा तुरा मिळवला आहे. त्यामुळे लवकरच स्मृती मितालीचा सर्वाधिक वनडे शतकांच विक्रम मोडीत काढू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *