Breaking News

Vinesh Phogat Join Congress: विनेश-बजरंग राजकारणाच्या आखाड्यात! कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताच केला गौप्यस्फोट

vinesh phogat join congress
Photo Courtesy: X/INC

Vinesh Phogat Join Congress: भारताची अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिने अखेर राजकारणात प्रवेश केला आहे. रेल्वेच्या आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर, अवघ्या काही तासातच तिने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Vinesh Phogat Join Congress) पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. दिल्ली येथे पक्षाचे जनरल सेक्रेटरी केसरी वेणूगोपाल व दीपक बावरिया यांच्या उपस्थितीत तिच्यासह ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) याने देखील काँग्रेस पक्षात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

विनेश हे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ऑलिंपिक पदक हुकल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर तिने काँग्रेसने ते दिपेंद्र हुडा व राहुल गांधी यांची देखील भेट घेतली त्यानंतर आता तिने अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला आहे.

Vinesh Phogat चा धक्कादायक निर्णय! नोकरीचा दिला राजीनामा, भविष्याबद्दल म्हणाली…

काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बोलताना ती म्हणाली, “काँग्रेस पक्षाचे मी आभार मानते. कारण, ज्यावेळी गरज होती त्यावेळी ते आमच्यासोबत राहिले. आम्हाला दिल्लीच्या रस्त्यांवर ओढले जात हो,ते तेव्हा बीजेपी सोडून सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला. काँग्रेसही त्यापैकी एक होती. मला अभिमान आहे की, मी अशा विचारधारेशी जोडले जात आहे जे महिलांचा सन्मान करतात.”

विनेशसह बजरंग हा देखील काँग्रेस पक्षात सामील झाला आहे.‌ हरियाणात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये या दोघांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. यासोबतच काँग्रेस प्रणित सरकार आल्यास त्यांचा मंत्रिमंडळात देखील समावेश केला जाऊ शकतो.‌

(Vinesh Phogat Join Congress With Bajrang Punia)