Breaking News

विराट-रोहित पाठोपाठ दोन वेळच्या विश्वविजेत्या भारतीय गोलंदाजाची निवृत्ती, 36 व्या वर्षीच सोडले क्रिकेट

TEAM INDIA 2011 WC
Photo Courtesy: X

Indian Cricketer Piyush Chawla Retirement: सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेणार आहे खेळाडूंची संख्या वाढत आहे. भारतीय क्रिकेटचे स्तंभ असलेल्या विराट कोहली व रोहित शर्मा यांनी नुकतीच कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता भारताचा माजी फिरकीपटू पियुष चावला (Piyush Chawla) याने देखील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. चावला मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघाच्या बाहेर होता.

Piyush Chawla Announced Retirement

पियुष चावला याने इंस्टाग्राम पोस्ट करत लिहिले, ‘जवळपास दोन वर्ष मैदानात घालवल्यानंतर आता या सुंदर खेळाला अलविदा करण्याची वेळ आली आहे. भारताकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाले. दोन विश्वचषक विजेत्या संघांचा भाग असणे, माझ्यासाठी गौरवास्पद राहिले.’ त्याने या पोस्टमध्ये बीसीसीआय, सहकारी खेळाडू, आयपीएल फ्रॅंचाईजी, प्रशिक्षक व कुटुंब यांचे देखील आभार मानले.

पियुष याने वयाच्या 17 व्या वर्षी उत्तर प्रदेशसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केलेले. मात्र, त्या आधीच 2006-2007 चॅलेंजर्स ट्रॉफी सामन्यात सचिन तेंडुलकरला गुगलीवर त्रिफळाचीत करून तो चर्चेत आलेला. त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी निवडण्यात आले. पियुष चावलाने भारतासाठी केवळ तीन कसोटी, 25 वनडे व 7 टी20 सामने खेळले. असे असल्या तरी तो भारताच्या 2007 टी20 व 2011वनडे विश्वचषक संघाचा सदस्य होता. याव्यतिरिक्त 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेता बनवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 1000 पेक्षा जास्त बळी मिळवले आहेत.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

Piyush Chawla Retired From All Form Of Cricket

India Tour Of England 2025: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, कसोटी संघात अनेक नवे चेहरे, पाहा संपूर्ण संघ

Piyush Chawla Retired From All Form Of Cricket