
India Won Lords Test By 2 Wickets: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला गेला. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात इंग्लंडने संघाने 22 धावांनी थरारक विजय मिळवला. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व यांच्यासोबत अखेरच्या दोन गड्यांसाठी भागीदाऱ्या करत झुंज दिली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) सामन्याचा मानकरी ठरला.
England Won Lords Test By 22 Runs
सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 135 धावांची गरज होती. मात्र, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या एक तासातच भारतीय फलंदाजांची कंबरडे मोडले. रिषभ पंत, केएल राहुल व वॉशिंग्टन सुंदर या तिघांना बाद करत त्यांनी भारतीय संघाची अवस्था 7 बाद 82 अशी केली. बेन स्टोक्स याने पुढे होऊन नेतृत्व करत सलग 10 षटके गोलंदाजी केली.
रवींद्र जडेजा व नितिशकुमार रेड्डी या दोन्ही अष्टपैलूंनी यानंतर 30 धावांची भागीदारी केली. मात्र, पहिल्या सत्राच्या अखेरच्या षटकात रेड्डी 13 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर भारताला अखेरच्या दोन सत्रात 81 धावांची आवश्यकता होती. अशावेळी जसप्रीत बुमराह याने जडेजाला साथ देण्याचे काम केले. त्याने तब्बल 54 चेंडू खेळत 5 धावा काढल्या. दोघांनी 132 चेंडूंमध्ये 35 धावांची भागीदारी केली
बुमराह बाद झाल्यानंतर आलेल्या मोहम्मद सिराज याने देखील अप्रतिम बचावात्मक खेळ केला. त्याने 30 चेंडूमध्ये चार धावांचे योगदान दिले. मात्र, शोएब बशीरच्या चेंडूवर तो बसला व त्याच्या अंगाला लागून गेलेल्या चेंडू यष्ट्यांवर धडकला. यासह भारताने सामना गमावला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।