Breaking News

BREAKING: शूटर मनू भाकेरचा ‘कांस्य’वेध! Paris Olympics 2024 मध्ये भारताने उघडले मेडलचे खाते

PARIS OLYMPICS 2024
Photo Courtesy: X

Manu Bhaker Won Silver Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये दुसऱ्याच दिवशी भारताच्या पदकांचे खाते खोलले. नेमबाज मनू भाकेर हिने 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात कांस्यपदक जिंकले.

शनिवारी (27 जुलै) रोजी झालेल्या पात्रता फेरीत चौथ्या स्थानी राहत मनूने अंतिम फेरीतील जागा निश्चित केली होती. अंतिम फेरीत उतरताना तिच्याकडे ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला नेमबाज होण्याची संधी होती. अंतिम फेरी सुरू झाल्यानंतर तिने पहिल्या तीन राऊंडमध्ये दुसऱ्या स्थानावर मजल मारली. ती कामगिरी सातत्य राखत नेहमी तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर राहिली.

अखेरच्या तीन नेमबाज बाकी असताना म्हणून दुसऱ्या स्थानी देखील पोहोचली होती. मात्र, अखेरच्या फायरमध्ये 0.1 इतक्या फरकाने मागे पडल्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. सुवर्ण व रौप्य पदके कोरियन नेमबाजांनी आपल्या नावे केली.

पदक जिंकल्यानंतर बोलताना मनू म्हणाली, “हे पदक माझे एकटीचे नसून, संपूर्ण देशवासीयांचे आहे.”

मनू हिने यापूर्वी कॉमनवेल्थ एशियन गेम्स मध्ये सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली होती. टोक‌ियो ऑलिंपिक्समध्ये ती पदक जिंकण्यापासून वंचित राहिलेली. मात्र, यंदा तिने ती कसर भरून काढली.

(Manu Bhaker Won Bronze Medal In Paris Olympics 2024)