भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या साखळी फेरीतूनच बाद व्हावे लागल्यानंतर आता रोहित विश्वचषकाच्या तयारीला लागलेला दिसून येतोय. असे असतानाच त्याने खेळाडूंच्या गोपनियतेच्या अधिकाराबाबत एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. यामध्ये त्याने प्रसारण वाहिनी स्टार स्पोर्ट्सवर गंभीर आरोप लावलेले. या आरोपांना आता स्टार स्पोर्ट्सने उत्तर दिले आहे.
काय म्हणालेला रोहित?
रोहितने एक्स पोस्ट करत लिहिलेले, ‘आता क्रिकेटपटूंच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाते. सराव सत्र असो किंवा सामना असो प्रत्येक छोटी छोटी गोष्ट टिपली जाते. इतकेच नव्हे तर आम्ही मित्रांसोबत काय बोलतो याचा देखील आवाज रेकॉर्ड केला जातो. स्टार स्पोर्ट्स ला मी याबाबत विनंती करून देखील त्यांनी आवाज रेकॉर्ड करून तो प्रसारित केलेला. हा आमच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग आहे. यामुळे एक दिवस खेळाडू आणि क्रिकेटच्या विश्वासार्हतेला तडा जाईल.”
यावर स्पष्टीकरण देताना स्टार स्पोर्ट्सने आपण असे कोणतेही चित्रण आवाजासह न चालवल्याचे म्हटले. ते फक्त एका पॅकेजसाठी होते आणि त्यावर आवाज नव्हता, असे उत्तर त्यांनी दिले. मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यापूर्वी रोहित आणि अभिषेक नायर यांच्यातील संभाषण व्हायरल झाले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झालेला. मात्र, हे संभाषण कोलकाता नाईट रायडर्सच्या सोशल मीडिया हँडलवरून प्रसारित केले गेलेले. वादानंतर ते त्यांनी हटवले होते.
आपल्या अखेरच्या सामन्यापूर्वी देखील रोहित एका कॅमेरामनला आवाज न रेकॉर्ड करण्याबाबत विनंती करताना दिसून आला होता. काही दिवसांपूर्वी विराट कोहली यांनी देखील खेळाडूंच्या गोपनीयतेबाबत वक्तव्य केलेले.
(Star Sports Gives Clarification On Rohit Sharma Allegations)
“मर्यादा सोडू नका”, ‘त्या’ प्रकरणामुळे संतापला रोहित शर्मा, वाचा काय घडले