
Why Lords Cricket Ground called the Mecca of Cricket: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील तिसरा कसोटी सामना लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lords Test) खेळला जातोय. या कसोटीची आणि खास करून लॉर्ड्स क्रिकेट मैदानाची सध्या क्रिकेटवर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. क्रिकेटचा जन्म झालेल्या इंग्लंडमध्ये आणि संपूर्ण जगभरात इतरही अनेक सुरेख, शानदार आणि अद्यावत क्रिकेट स्टेडियम असताना इतर स्टेडियमपेक्षा या स्टेडियमचे नाव इतक्या आदराने का घेतला जाते? क्रिकेटची पंढरी किंवा क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या या लॉर्ड्सला इतका मान आणि आदर का मिळतो? क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाचे इथे खेळायचे स्वप्न का पाहतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील. (Story Of Lords Cricket Ground)
Test match mornings. pic.twitter.com/TtjZ06sxUO
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) July 10, 2025
Why Lords Cricket Ground called the Mecca of Cricket?
जगातील प्रत्येक ग्राउंड आणि स्टेडियम हे गरजेतून उभ राहिलेले आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड देखील त्यापैकीच एक. मात्र, या लॉर्ड्सला एक दैदिप्यमान इतिहास आहे जो इतर सार्या मैदानाला कदाचित नसेल. आपण नेहमी लॉर्ड्सला मक्का ऑफ क्रिकेट, क्रिकेटची पंढरी असे संबोधतो. त्यामागे एक कारण दिले जाते की, हे लॉर्ड्स जगातील सर्वात जुने क्रिकेट ग्राउंड आहे. मात्र, ही अत्यंत चुकीची माहिती असल्याचे दिसते. इंग्लंडमध्ये लॉर्ड्सपेक्षा 50-55 वर्ष जुनी ग्राउंड अस्तित्वात आहेत. तरीदेखील, लॉर्ड्सलाच क्रिकेटची पंढरी म्हणण्याचे कारण काय?
क्रिकेटची सुरुवात इंग्लंडमध्ये झाल्याचे आपण जाणतोच. इंग्लंडमधील गावागावात क्रिकेट खेळले जायचे. तिथल्या संस्थानिकांचा मनोरंजनासाठी हा आवडता खेळ होता. हळूहळू त्या संस्थानिकांनी क्रिकेटला राजाश्रय दिला आणि काउंटी टीम बनवून क्रिकेट स्पर्धात्मक पद्धतीने खेळायला सुरुवात केली. ज्या दोन संस्थानिकांचे संघ असायचे ते पैज लावायचे. पैजेची रक्कम एकत्रित केली जायची आणि जिंकणाऱ्या संघाला देण्यात यायची. हे त्यांचे बक्षीस.
या संस्थानांपैकी क्लब होता मेरीलबोन क्रिकेट क्लब (MCC). लंडनच्या पश्चिम भागात हा संघ क्रिकेट खेळायचा. सर जॉर्ज फिंच आणि सर चार्ल्स लीनॉक्स या संस्थानिकांनी हा क्लब सुरू केलेला. त्यांच्या संघातील सिनियर क्रिकेटर थॉमस लॉर्ड्स यांनी या दोन्ही संस्थानिकांच्या, इच्छेप्रमाणे सात एकर जमीन मेरीलबोन क्रिकेटसाठी दिली. फिंच आणि लीनॉक्स यांनी लॉर्ड्स यांचा मान राखत ग्राऊंडला त्यांचेच नाव देण्याचा निर्णय घेतला. 1887 मध्ये ग्राउंड तयार केल्यानंतर त्यांच्या क्लबची स्थापना झाली. त्यावेळी क्रिकेटचे असे कोणतेही पक्के किंवा लिखित नियम नसायचे. बॅट, खेळपट्टी, वेडी वाकडी मैदाने या गोष्टींवरून नेहमी वाद व्हायचे. आपल्या गल्ली क्रिकेटमध्ये होतात तसेच. त्यामुळे खेळात नियम आणण्याचा निर्णय एमसीसीने घेतला. हळूहळू एकेक नियम ते वाढवत गेले. 1887 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला गेला. मात्र, त्यावेळी त्या सामन्याची कर्ताधर्ता होती एमसीसी. (Latest Cricket News)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून 1930 पर्यंत त्याचा सारा कारभार एमसीसी पाहत होती. अखेर 1930 मध्ये एमसीसीनेच पुढाकार घेत एम्पिरिकल क्रिकेट कौन्सिलची सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पहिली संस्था. मात्र, इंग्लंड क्रिकेटचे सर्व हक्क त्यांच्याकडे होते. पुढे 1990 मध्ये एम्पिरिकल क्रिकेट कौन्सिलचे नामकरण इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) असे केले गेले. सोबतच इंग्लंड क्रिकेटसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाची स्थापना झाली. असे असले तरी, एमसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम बनवण्याचे अधिकार स्वतःकडेच ठेवले. आजही क्रिकेटमधील कोणताही नियम बदलायचा असल्यास, आयसीसीला एमसीसीची परवानगी घ्यावीच लागते.
लॉर्ड्सवरील प्रत्येक गोष्टीचे एक वेगळे महत्त्व आहे. लॉर्डर्सची बाल्कनी (Lords Balcony), ड्रेसिंग रूम्स, ओनर्स बोर्ड, पोर्ट्रेट्स, लॉंग रूम, लॉर्ड्स स्लोप (Lords Slope) आणि चाहते. त्या ऐतिहासिक लॉंग रूममधून बाहेर येण्याचे प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहतो. त्याच बाल्कनीत उभे राहून कपिल देव यांनी उंचावलेला वर्ल्डकप आणि सौरव गांगुलीने नेटवेस्ट ट्रॉफीनंतर भिरकावलेला शर्ट हे भारतीयांच्या नेहमी आठवणीत राहणारे क्षण. लॉर्ड्सची मेंबरशिप घ्यायची म्हटली तर सर्वसामान्यांना तब्बल 27 वर्ष वेटिंग लिस्टमध्ये राहाव लागेल. लॉर्ड्सच्या रिनोवेशननंतर एखाद्या युएफओसारख असणार मीडिया सेंटर ग्राऊंडच्या वैभवात आणखीनच भर टाकत आहे. लॉर्ड्स आणि क्रिकेटचा हा संपूर्ण इतिहास डोळ्याखालून घालायचा असल्यास, प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांचा ‘टूर डी लॉर्ड्स’ हा व्हिडिओ देखील युट्युबवर नक्की पहा.
(Why Lords Cricket Ground Called Mecca Of Cricket)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।