Breaking News

भारताच्या मेडल्सच्या अपेक्षांना हादरा! Glasgow Commonwealth 2026 मधून‌ ‘हे’ 9 खेळ बाहेर

Glasgow Commonwealth 2026:
Photo Courtesy: X

Glasgow Commonwealth 2026: ग्लासगो येथे होणाऱ्या ग्लासगो कॉमनवेल्थ 2026 (Glasgow Commonwealth 2026) स्पर्धेसाठी खेळांची घोषणा झाली आहे. गोल्ड क्वेस्ट यांनी आयोजनास नकार दिल्याने ग्लासगो येथे या स्पर्धा होतील. मात्र, त्यासाठी आयोजकांनी स्पर्धेत मोठे बदल केले असून, केवळ दहा खेळ यावेळी खेळवले जातील. तसेच रद्द केलेल्या खेळांपैकी 9 खेळ हे भारताला पदक मिळवून देणारे होते. त्यामुळे यावेळी भारतीय पथकाच्या (Indian Contingent) पदकसंख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे.

भारताला 2022 बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये 61 पदके मिळाली होती. त्यावेळी भारताने 19 पैकी 12 खेळ प्रकारांमध्ये पदके जिंकण्यात यश मिळवलेले. आता नव्याने रचना झालेल्या या खेळांमध्ये 9 खेळ सामील नसतील. मागील वेळी भारताने ज्या खेळांमध्ये मिळून 30 पदके जिंकली होती, ते खेळ यावेळी स्पर्धेत खेळले जाणार नाहीत.

ग्लासगो कॉमनवेल्थ 2026 मध्ये यावेळी नेमबाजी, कुस्ती, बॅडमिंटन, स्क्वॉश, क्रिकेट, हॉकी, टेबल टेनिस, ट्रायथलॉन व तिरंदाजी हे खेळ खेळले जाणार नाहीत. त्यामुळे भारताची पदके मोठ्या प्रमाणात कमी होतील. स्पर्धेच्या आयोजनातील खर्च कमी व्हावा, म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

भारतासाठी मागील वेळी कुस्तीमध्ये तब्बल 12 पदके आली होती. टेबल टेनिसमध्ये 7 व बॅडमिंटनमध्ये 6 पदके आलेली. तसेच क्रिकेटमध्ये एक आणि हॉकी व स्क्वॉशमध्ये‌ प्रत्येकी दोन पदके मिळालेली. मागील कॉमनवेल्थमध्ये भाग नसलेले नेमबाजी व तिरंदाजी हे खेळ यावेळी देखील स्पर्धेत खेळले जाणार नाहीत.

आता ग्लासगो कॉमनवेल्थ 2026 मध्ये भारताला बॉक्सिंग व ऍथलेटिक्समधूनच पदकाची अपेक्षा असणार आहे.

(9 Games Excluded From Glasgow Commonwealth 2026)

‘बर्थ डे बॉय’ Sarfaraz Khan बनला बाबा! वाढदिवसाची मिळाली मौल्यवान गिफ्ट

Exit mobile version