
Jharkhand Won SMAT 2025: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाची टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (18 डिसेंबर) खेळला गेला. पुणे येथे झालेल्या झारखंड विरुद्ध हरियाणा या अंतिम सामन्यात झारखंडने दणदणीत विजय मिळवत स्पर्धा आपल्या नावे केली. त्यांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील हे दुसरे तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील पहिले विजेतेपद ठरले.
Jharkhand Won SMAT 2025
गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे झालेल्या या अंतिम सामन्यात झारखंडने प्रथम फलंदाजी करताना केवळ 3 बळी गमावत 263 धावा काढल्या. कर्णधार ईशान किशन याने 101 तर कुमार कुशाग्र याने 81 धावांच्या खेळ्या केल्या. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 177 धावा केल्या. अनुकूल रॉय व रॉबिन मिंझ यांनी 29 चेंडूवर नाबाद 76 धावा फटकावल्या.
विजयासाठी मिळालेल्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना हरियाणा संघ पहिल्या षटकापासून माघारलेला दिसला. विकास सिंगने पहिल्या षटकात दोन बळी मिळवले. यशवर्धन दलाल याने हरियाणा संघासाठी एकमेव अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यांचा डाव 193 धावांवर संपुष्टात आला. यासह झारखंडने 69 धावांनी विजय संपादन केला.
अंतिम सामन्यात शतक झळकावणारा ईशान किशन सामनावीर तर झारखंडचा अष्टपैलू अनुकूल रॉय स्पर्धेचा मानकरी ठरला. झारखंडने 2010 मध्ये विजय हजारे ट्रॉफी जिंकत पहिले विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्यांचे हे केवळ दुसरे मोठे विजेतेपद आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: SMAT 2025 फायनलमध्ये Ishan Kishan चा झंझावात! झारखंडच्या फलंदाजांची दिवाळी
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।