Breaking News

“त्या दिवसापासून Rohit Sharma बदलला”, जवळच्या मित्राने केला रहस्यभेद, सांगितली ‘ती’ गोष्ट

Rohit Sharma
Photo Courtesy: XC/Rohit Sharma

Rohit Sharma Career Turning Point|भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. सध्या रोहित हा जगातील अव्वल फलंदाजांमध्ये येतो. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्याला एक गुणवान फलंदाज म्हणून ओळखले जात होते. मात्र, सुरुवातीच्या काही अपयशानंतर त्याला भारतीय संघातील जागा गमवावी लागली होती. त्याने पुन्हा एकदा या अपयशातून भरारी घेत थेट भारतीय संघाचा कर्णधार होण्यापर्यंत मजल मारली. त्याच्या याच प्रवासावर आता त्याचा मित्र व माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर (Abhishek Nayar) याने प्रतिक्रिया दिलेली आहे.

रोहित शर्मा याने भारतीय संघासाठी 2007 मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो सलग तीन वर्ष भारतीय संघाचा सदस्य राहिला. भारतात झालेल्या 2011 वनडे विश्वचषक संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर त्याने पुढील वर्षी पुन्हा एकदा पदार्पण केले. चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 पासून सलामीवीर म्हणून खेळताना त्याने विशेष ओळख निर्माण केली. मागील चार वर्षांपासून तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. तसेच, विराट कोहलीनंतर त्याला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जाते.

त्याच्या याच प्रवासाबद्दल बोलताना त्याचा मुंबई संघातील माजी सहकारी व सध्या प्रशिक्षक म्हणून नाव कमावत असलेला अभिषेक नायर म्हणाला,

“अनेक लोक बोलतात की रोहित शर्मा याला फलंदाजीची कला ही नैसर्गिक देण म्हणून मिळाली आहे. सुरुवातीच्या काळात असे अनेकांना वाटत व आत्ताही लोक असे बोलतात. मात्र, त्याने जितकी मेहनत घेतली आहे तितकी कोणीही घेत नाही. 2011 वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याची निवड झाली नव्हती. त्यानंतर तो मला म्हणालेला, ‘मी इतकी मेहनत करणार आहे की लोक म्हणतील हा दुसरा रोहित शर्मा आहे.’ त्याने ते करून देखील दाखवले.

रोहित व अभिषेक हे चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्ष मुंबई रणजी संघासाठी एकत्रित योगदान दिले आहे. अभिषेक याने काही वर्षांपूर्वीच निवृत्ती घेत प्रशिक्षणात हात आजमावला आहे.

(Abhishek Sharma Speaks On Rohit Sharma Career)

2 comments

  1. After study just a few of the weblog posts on your web site now, and I really like your method of blogging. I bookmarked it to my bookmark website checklist and might be checking back soon. Pls try my website online as properly and let me know what you think.

  2. Hello I am so grateful I found your web site, I really found you by error, while I was browsing on Google for something else, Regardless I am here now and would just like to say kudos for a marvelous post and a all round interesting blog (I also love the theme/design), I don’t have time to go through it all at the moment but I have bookmarked it and also added your RSS feeds, so when I have time I will be back to read a lot more, Please do keep up the awesome work.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version