Breaking News

LLC 2024 लिलावात रिटायर खेळाडूंवर बरसला ‘गब्बर’ पैसा! दिग्गजांसह आयपीएल स्टार्सही मालामाल

LLC 2024
Photo Courtesy: X

LLC 2024 Auction: निवृत्त क्रिकेटपटूंसाठी होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket 2024) स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी लिलाव गुरूवारी (29 ऑगस्ट) पार पडला. या लिलावात अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावली गेली. नुकतीच निवृत्ती स्वीकारलेला भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) हादेखील या स्पर्धेत खेळताना दिसेल.

LLC 2024 Auction Shikhar And DK Playing Upcoming Season

सहा संघांच्या या स्पर्धेसाठी अनेक आंतरराष्ट्रीय व भारतात क्रिकेट खेळलेल्या वरिष्ठ क्रिकेटपटूंनी आपली नावे नोंदवले होते. लिलावाआधी प्रत्येक संघाला जास्तीत जास्त तीन खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी मिळाली होती. तसेच, तीन पेक्षा कमी खेळाडू कायम ठेवलेल्या, संघांना लिलावाआधीच एका खेळाडूला संघात स्थान देण्याची मुभा दिली गेलेली. याचा फायदा घेत सदर्न सुपरस्टार्सने मागील महिन्यात निवृत्त झालेल्या दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला निवडले. तर, गुजरात संघाने शिखर धवनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज इसरू उदाना याला सर्वाधिक 61 लाख 90 हजारांची बोली लागली. तो हैदराबाद अर्बनायझरसाठी खेळेल. त्यांनीच वेस्ट इंडिजचा चॅडविक वॉल्टन  याला 60 लाख 30 हजार रुपये मोजले. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू डॅन ख्रिस्टीयन याला मनिपाल टायगर्सने 55.90 लाखांची बोली लावत आपल्याकडे खेचले. तर, न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर 50 लाखांसह कोणार्क सूर्याज संघासाठी खेळेल. भारताचा माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी याच्यावर इंडिया कॅपिटल संघाने 50 लाखांची बोली लावली.

या दिग्गजांसोबतच भारतीय संघासाठी कधीही न खेळलेल्या प्रवीण गुप्ता (48.5 लाख), भरत चिपळी (37 लाख), सुबोध भाटी (38 लाख) व प्रवीण तांबे (28 लाख) यांना देखील मोठी रक्कम मिळाली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

लिलावापूर्वी संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये भारताचे प्रमुख खेळाडू आहेत. गतविजेत्या इंडिया कॅपिटल्स संघाने ऍश्ले नर्स व बेन डंक यांना कायम ठेवले. तर, मनिपाल टायगर्सने हरभजन सिंग, रॉबिन उथप्पा व थिसारा परेरा यांना रिटेन केलेले. हैदराबाद अर्बनायझरने सुरेश रैना, गुरकीरत मान व पीटर ट्रेगो यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तर, नव्याने सामील झालेल्या कोणार्क सूर्याजने भारताचे माजी क्रिकेटपटू बंधू युसुफ पठाण व इरफान पठाण यांना निवडले. सदर्न सुपरस्टार्सने अब्दुर रझाक आणि गुजरातने ख्रिस गेलला कायम ठेवलेले.

(LLC 2024 Auction Retired Cricketers Got Huge Prize Shikhar Dhawan)

हे वाचलंत का?

क्रिकेटविश्वात चाललंय तरी काय? ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अवघ्या 26 व्या वर्षी निवृत्त, धक्कादायक कारण समोर

Exit mobile version