Breaking News

कुस्ती

World Wrestling Championship 2025 मधून भारत रिकाम्या हाताने परत, तीन वर्षांचा दुष्काळ सुरूच

world wrestling championship 2025

World Wrestling Championship 2025: क्रोएशिया येथील झागरेब या ठिकाणी सुरू असलेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंच्या हाती अपयश लागले आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताच्या पुरुष व महिला कुस्तीपटूंना एकही पदक जिंकता आले नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी भारताचा पदकांचा दुष्काळ कायम राहिला.  INDIA FREESTYLE RETURNS WITHOUT ANY MEDAL …

Read More »

क्रिकेटच्या मैदानानंतर Rohit Pawar कुस्तीच्या आखाड्यात! राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड

Rohit Pawar Elected As Maharashtra Rajya Kustigir Parishad President: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा राजकीय मैदान मारल्यानंतर कुस्तीच्या मैदानातही त्यांनी विजयश्री मिळवली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व जिल्हा संघ आणि …

Read More »

Hitomi Obara Death: ऑलिंपिक सुवर्ण विजेत्या कुस्तीपटूचे निधन, 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Hitomi Obara Death: जपानची माजी कुस्तीपटू हितोमी ओबारा हिचे निधन झाले. ती 44 वर्षांची होती. तिच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हितोमी हिने जपानसाठी 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. UWW is deeply saddened by the passing of 2012 London Olympic gold medalist and eight-time world champion Hitomi OBARA …

Read More »

अहिल्यानगरची शान Sujay Tanpure ची आणखी एक कमाल! देशासाठी 17 व्या वर्षी जिंकले सुवर्ण

Wrestler Sujay Tanpure Won Gold: व्हिएतनाम येथील ऊंग ताऊ येथे सुरू असलेल्या अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 (U17 Asian Wrestling Championship 2025) स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झाले. मुलांच्या 70 किलो वजनी गटात भारताच्या सुजय तनपुरे याने सुवर्णपदक आपल्या नावावर केले. व्हिएतनाम येथे पार पडलेल्या आशियाई कुस्ती …

Read More »

तब्बल 44 महिन्यांनंतर कुस्तीपटू Sushil Kumar ला मिळाला जामीन, ‘त्या’ ह’त्या प्रकरणात काढली साडेचार वर्ष तिहारमध्ये

Wrestler Sushil Kumar Granted Bail: दोन वेळा ऑलिंपिक पदक मिळवणारा भारताचा कुस्तीपटू सुशील कुमार (Wrestler Sushil Kumar) याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. युवा कुस्तीपटू सागर धनकर ह’त्या प्रकरणात तो मे 2021 पासून तो तिहार कारागृहात होता. न्यायाधीश संजीव नरूला यांनी 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला. …

Read More »

Purandar Kesari 2025: यश वासवंड ठरला पुरंदर केसरीचा मानकरी! प्रसाद जगदाळे सलग दुसऱ्यांदा उपविजेता

Purandar Kesari 2025: पुरंदर तालुका कुस्तीगीर संघ व पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पुरंदर केसरी 2025 (Purandar Kesari 2025) स्पर्धा सोमवारी (3 मार्च) समाप्त झाली. आंबेगावच्या यश वासवंड (Yash Vasvand) याने पिसर्वेच्या प्रसाद जगदाळे (Prasad Jagdale) याला पराभूत करत ही मानाची गदा पटकावली. (Yash Vasvand Purandar …

Read More »

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला Maharashtra Kesari 2025 चा मानकरी, महेंद्र गायकवाड पुन्हा उपविजेता

Maharashtra Kesari 2025: अहिल्यानगर येथे आयोजित 67 व्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2025) स्पर्धेत सोलापूरच्या पृथ्वीराज मोहोळ (Prithviraj Mohol) याने विजय मिळवला. अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड पराभूत केले. Mahendra Gaikwad Won Maharashtra Kesari 2025 गादी विभागातील वादग्रस्त अंतिम सामन्यानंतर पृथ्वीराज मोहोळ या अंतिम सामन्यात उतरला होता. तर, माती …

Read More »

व्हिडिओ: Maharashtra Kesari 2025 स्पर्धेत राडा! डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांना मारली लाथ

Maharashtra Kesari 2025: अहिल्यानगर येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 (Maharashtra Kesari 2025) स्पर्धेत एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. गादी विभागाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने पंचांना लाथ मारली. आपल्याला चुकीच्या पद्धतीने चितपट दिल्याचा आरोप त्याने केला. या प्रकरणाने संपूर्ण कुस्ती क्षेत्रात खळबळ …

Read More »

Vinesh Phogat ने मारली राजकारणाची कुस्ती! इतक्या हजार मतांनी झाली विजयी

Vinesh Phogat: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. नुकतीच कुस्तीला रामराम ठोकून, राजकारणात उडी घेतलेल्या कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat Election) हिने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. जुलाना विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढलेल्या विनेश हिने भाजपच्या कॅप्टन योगेश बैरागी यांना 6015 मतांनी पराभूत केले. देश की बेटी …

Read More »

Vinesh Phogat चा पंतप्रधान मोदींबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, “व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग करून ते…”

Vinesh Phogat On PM Modi Call: भारताची माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश करूनही तिला अपात्र (Vinesh Phogat Olympic Disqualification) घोषित करण्यात आले होते. त्यानंतर तिने निवृत्ती जाहीर करत, थेट सक्रिय राजकारणात उडी घेतली. आता हरियाणा …

Read More »
Exit mobile version