Breaking News

अहिल्यानगरची शान Sujay Tanpure ची आणखी एक कमाल! देशासाठी 17 व्या वर्षी जिंकले सुवर्ण

SUJAY TANPURE
Photo Courtesy: X

Wrestler Sujay Tanpure Won Gold: व्हिएतनाम येथील ऊंग ताऊ येथे सुरू असलेल्या अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 (U17 Asian Wrestling Championship 2025) स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झाले. मुलांच्या 70 किलो वजनी गटात भारताच्या सुजय तनपुरे याने सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

Wrestler Sujay Tanpure Won Gold In Asian Wrestling Championship 2025

सुजय तनपुरे याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मात देत 70 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली होती. त्याने अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या अरालिव्ह याला गुणांवर पराभूत करत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत यापूर्वी महाराष्ट्राच्या आदित्य जाधव (Wrestler Aditya Jadhav) याने भारताला रौप्य पदक जिंकून दिले होते.

सुजय नागनाथ तनपुरे हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याच्या शिऊर गावचा रहिवासी आहे. तो पुण्यात मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात पंकज हरपुडे व महेश मोहोळ यांच्या मार्गदर्शनात सराव करतो. सुजय याने यापूर्वी देखील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: Yash Dayal Accused Of Sexual Harrasment: आरसीबीच्या युवा गोलंदाजावर महिलेचे गंभीर आरोप, थेट योगी आदित्यनाथांकडे मागितला न्याय

 

Exit mobile version