
Maharashtra Squad For Hindkesari 2025: पारंपारिक भारतीय कुस्तीची सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या हिंदकेसरी स्पर्धेचे 52 वे अधिवेशन सातारा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे आठ पैलवान खुल्या गटात आव्हान सादर करतील. ही स्पर्धा 20 ते 23 नोव्हेंबर या काळात खेळली जाईल.
Maharashtra Squad For Hindkesari 2025
पुणे जिल्ह्यातील वडकी येथे पार पडलेल्या चाचणी फेरीत आठ पैलवानांनी चमकदार कामगिरी करत या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. यामध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (Wrestler Vijay Choudhary), महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol), उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad), हर्षवर्धन सदगीर, शुभम शिदनाळे, रविराज चव्हाण, अक्षय मांगवडे व जयदीप पाटील यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त वजनी गटातील विविध कुस्तीपटूंची देखील निवड केली गेली.
सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. यामध्ये 500 पेक्षा जास्त पुरुष व दोनशे पेक्षा जास्त महिला कुस्तीपटू सहभाग घेतील. हिंदकेसरी खिताब जिंकणाऱ्या पैलवानाला महिंद्रा थार गाडी व मानाची गदा देण्यात येणार आहे. तर, पुरुषांच्या वजनी गटातील प्रत्येक विजेत्याला दुचाकी व महिला वजनी गटातील प्रत्येक विजेतीला स्कुटी देण्यात येईल. या स्पर्धेचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होईल.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: WTC च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार Freedom Trophy 2025! जगज्जेत्यांना रोखणार का टीम इंडिया?