Breaking News

T20 World Cup| पापुआ न्यू गिनीने विंडीजला झुंजवले, चेसच्या खेळीने यजमानांचा संघर्षपूर्ण विजय

IPL 2024
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या दिवशी दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज व पापुआ न्यू गिनी (WIvPNG) यांच्या दरम्यान झाला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात दुबळ्या पापुआ न्यू गिनी संघाने यजमानांना चांगलेच झुंजवले. मात्र, अखेरीस अनुभवी रोस्टन चेस (Roston Chase) व आंद्रे रसेल यांनी आक्रमक फटकेबाजी करत संघाला विजयापर्यंत नेले. या सामन्यात 5 गड्यांनी विजय संपादन करत विजयी सुरुवात केली.

गयाना येथे झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच उत्कृष्ट गोलंदाजी करत नवख्या पीएनजी फलंदाजांवर दडपण आणले. कर्णधार असद वाला याने थोडाफार संघर्ष करत 21 धावा केल्या. एका बाजूने नियमित फलंदाज बाद होत असताना सेसे बाऊ याने संघर्ष करत शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे संघाने शतकी मजल मारली. अखेरच्या षटकांमध्ये डोरिंगा याने महत्त्वपूर्ण 27 धावा करत संघाला 136 अशी सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. वेस्ट इंडिजसाठी रसेल व अल्झारी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करताना जॉन्सन चार्ल्सच्या रूपाने वेस्ट इंडिजला दुसऱ्या षटकात धक्का बसला. त्यानंतर ब्रँडन किंग (34 धावा/29 चेंडू) व निकोलस पूरन (27 चेंडू/27 धावा) यांनी अर्धशतकी भागीदारी केली मात्र ते धावांचा वेग वाढवू शकले नाहीत. कर्णधार पॉवेलने देखील 15 धावा केल्या. तर, रूदरफोर्ड याने 2 धावा केल्या. संघ अडचणीत आलेला असताना रोस्टन चेस याने 27 चेंडूवर नाबाद 42 व आंद्रे रसेल याने 9 चेंडूवर नाबाद 15 धावा करत विजय साकार केला. चेस याला सामनावीर पुरस्कार दिला गेला.

(T20 World Cup 2024| West Indies Best Papua New Gini By 5 Wickets Chase Shine)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version