Breaking News

BGT 2024-2025: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा, अखेर ‘त्या’ खेळाडूला संधी मिळालीच, पाहा संपूर्ण स्कॉड

bgt 2024-2025
Photo Courtesy: X/BCCI

Team India For BGT 2024-2025: चालू वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या उदाहरणात भारतीय संघ पाच सामन्यांची मोठी कसोटी मालिका खेळली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे.

India Sqaud For BGT 2024-2025

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ ही मालिका खेळेल. बंगालचा अनुभवी सलामीवीर अभिमन्यू ईस्वरन (Abhimanyu Easwaran) याला या संघात स्थान मिळाले आहे. याव्यतिरिक्त नितिशकुमार रेड्डी व हर्षित राणा प्रथमच कसोटी संघाचा भाग बनले आहेत.

या मालिकेसाठी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी उपलब्ध असेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, त्याला संघात जागा मिळाली नाही. तसेच, अक्षर पटेल हा देखील संघात जागा मिळवण्यात अपयशी ठरला. सध्या खराब फॉर्ममधून चाललेल्या केएल राहुल याला मात्र आपली जागा वाचवण्यात यश आले.

क्रिकेट जगतातील हायप्रोफाईल मालिका मानल्या जाणाऱ्या या मालिकेचा शुभारंभ 22 नोव्हेंबर रोजी पर्थ येथे होईल. त्यानंतर थेट 6 डिसेंबर रोजी ऍडलेड येथे दिवस-रात्र कसोटी होणार आहे. त्यानंतर ब्रिस्बेन येथे 14 डिसेंबरपासून तिसरा सामना होईल. मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी खेळली जाईल. तर, अखेरचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे होणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, अभिमन्यू ईस्वरन, नितिशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

(Team India For BGT 2024-2025)

Ruturaj Gaikwad च्या खांद्यावर मोठी जबाबदारी! ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी बीसीसीआयचा महत्वाचा निर्णय

Exit mobile version