Breaking News

Indian Wrestlers Protest: बृजभूषण यांच्याविरोधात भाजप नेत्याचाच कट? धक्कादायक गौप्यस्फोटाने कुस्तीपटू आंदोलन प्रकरणात ट्विस्ट

indian wrestlers protest
Photo Courtesy: X

Indian Wrestler Protest Against Brij Bhushan Sharan Singh: मागील दोन वर्षांपासून गाजत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधातील भारतीय कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत (Indian Wrestlers Protest) मोठी बातमी समोर येत आहे. या आंदोलनात अग्रेसर असलेल्या ऑलिंपिक पदक विजेत्या कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने याबाबत एक खुलासा केला. माजी कुस्तीपटू व भाजप नेत्या बबिता फोगट (Babita Phogat) यांनीच आम्हाला आंदोलनासाठी भरीस घातल्याचे तिने म्हटले.

भारताचे आघाडीचे कुस्तीपटू वसलेल्या बजरंग पुनिया, साक्षी व विनेश फोगट यांच्या नेतृत्वात शेकडो कुस्तीपटूंनी 2023 जानेवारी महिन्यात जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते. बृजभूषण सिंग यांनी अनेक महिला कुस्तीपटूंचे लैं’गिक शोषण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे प्रकरण संपूर्ण जगभरात गाजले. त्यानंतर खेळाडूंनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्याय मागितला होता. मात्र, पंतप्रधानांनी या गोष्टीकडे लक्ष न दिल्याने खेळाडूंनी पुन्हा एकदा आंदोलन केलेले. जवळपास दीड वर्ष हे प्रकरण गाजत असतानाच, बृजभूषण यांना आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अद्यापही हे प्रकरण न्यायालयात आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

या संपूर्ण प्रकरणावर एका मुलाखतीत बोलताना साक्षी हिला, हे आंदोलन काँग्रेस पक्ष पुरस्कृत होते, असा आरोप केला जातो. यावर प्रतिक्रिया विचारली गेली. त्यावर बोलताना ती म्हणाली, “यामध्ये कोणतीही सत्यता नाही. याउलट, भाजपची नेता असलेली बबिता फोगट हिनेच आम्हाला आंदोलनाची परवानगी मिळवून दिली होती. आम्हाला वाटले होते की, ती देखील आमच्यासोबत या आंदोलनात सहभागी होईल. मात्र, तिने पलटी मारली. सिंग यांना हटवून बबिता हिला कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व्हायचे होते.”

साक्षी हिच्या या वक्तव्याने आता या प्रकरणात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. बबिता ही देखील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहिली असून, तिने काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तसेच तिने निवडणूक देखील लढवली होती. कुस्तीपटूंच्या आंदोलनात तिने सरकारची बाजू अनेक वेळा लावून धरलेली.

(Sakshi Malik On Indian Wrestlers Protest)

हे देखील वाचा: Vinesh Phogat चा पंतप्रधान मोदींबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, “व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग करून ते…”

Exit mobile version