
World Tennis League In India: सलग तीन हंगाम संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे यशस्वी झाल्यानंतर आता वर्ल्ड टेनिस लीग भारतात दाखल होत आहे. जगातील अव्वल टेनिसपटू खेळत असलेल्या स्पर्धेचा नवा हंगाम बंगळूर येथे 17 ते 20 डिसेंबर दरम्यान होईल. स्पर्धेत डॅनियल मेदवेदेव (Daniel Medvedev), गेल मॉंफिल्स व सबालेंका यांच्यासारख्या दर्जेदार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी भारतीयांना मिळेल.
https://twitter.com/TennisWorl76726/status/1990713621584744789
World Tennis League In India
कर्नाटक राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या एस.एम कृष्णा स्टेडियमवर हे सामने होतील. यावर्षीच्या आवृत्ती मेदवेदेव, मॉंफिल्स व सबालेंका यांच्यासोबतच निक किर्गिऑस, आर्थर फिल्म व मॅग्डा लिनेट हे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू दिसतील. भारताचे अनुभवी रोहन बोपण्णा व सुमीत नागल हे देखील आपला दम दाखवतील.
भारतातील टेनिसच्या वाढत्या लोकप्रियतेने डब्ल्यूटीएलध्ये युकी भांबरी, अंकिता रैना, माया रेवती, डी सुरेश यांच्यासारखे उदयोन्मुख खेळाडू सहभागी होत आहेत.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Indian Football Team ने गाठला तळ! बांगलादेशनेही चारली धूळ