Breaking News

Indian Football Team ने गाठला तळ! बांगलादेशनेही चारली धूळ

indian football team
Photo Courtesy: X/Indian Football Team

Indian Football Team Lost Against Bangladesh: एएफसी एशियन कप क्वालिफायर (AFC Asian Cup Qualifier) मध्ये भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध झाला. ढाका येथे झालेल्या या सामन्यात यजमान बांगलादेशने 1-0 असा विजय संपादन केला. भारत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आपल्या पाचपैकी एकाही सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी ठरला नाही. 

Indian Football Team Lost Against Bangladesh In AFC Asian Cup Qualifier

नव्या उमेदीने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला या सामन्यात विजयाची अपेक्षा होती. मात्र, सामन्याच्या सुरुवातीपासून बांगलादेश संघाने आक्रमक खेळ केला. त्यांच्या या प्रयत्नांना 11 व्या मिनिटाला यश आले. शेख मोर्सालिन याने गोल करत यजमान संघाला आघाडीवर नेले. पहिल्या हाफमध्ये हा एकमेव गोल झाला. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने प्रयत्न केले. मात्र, हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. परिणामी, भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. भारताचा अखेरचा साखळी सामना हॉंगकॉंगविरूद्ध होईल.

खालिद जमील मुख्य प्रशिक्षक बनल्यापासून भारतीय संघाने काहीशी आश्वासक कामगिरी केली होती. भविष्याचा विचार करता भारतीय संघाने ओसीआय खेळाडूंना करारबद्ध करण्याबाबत गांभीर्याने विचार केला आहे. रायन विल्यम्स व अबनित भारती हे भारतीय संघासाठी खेळण्याकरिता पात्र झाले असून, कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ते भारतीय जर्सीत दिसतील.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: कोण आहे हा Kartik Sharma? आयपीएल लिलावाआधीच मार्केटमध्ये चाललंय नाव

Exit mobile version