Breaking News

“मर्यादा सोडू नका”, ‘त्या’ प्रकरणामुळे संतापला रोहित शर्मा, वाचा काय घडले

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा सातत्याने चर्चेत असतो. सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2024 मध्ये तो खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला ही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईचा संघ केवळ चार विजय मिळवून गुणतालिकेत आकृत्या स्थानी राहिला. असे असले तरी आता त्यानंतर रोहित शर्माचे एक मोठे विधान समोर आलेले आहेत. त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत आपले मनमोकळे केले.

काय म्हणाला रोहित?

रोहित शर्मा याने आपल्या एक्स हॅण्डल वर एक पोस्ट करत लिहिले,

“सध्या क्रिकेटपटूंच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप केला जात आहे.‌ सामना असो किंवा सराव सत्र असो आमची प्रत्येक हालचाल टिपली जाते. ते सर्व ठीक असले तरी आम्ही खासगीत मित्र किंवा सहकाऱ्यांशी काही बोलत असलो त्या गोष्टीचे देखील चित्रण होताना दिसते. मी स्टार स्पोर्ट्सला संभाषण चित्रित न करण्याची विनंती करून देखील, त्यांनी ते चित्रण केले व प्रसारितही केले. हा प्रत्येक व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग आहे. एक्सक्लुझिव्ह कंटेंटच्या नादात एक दिवस क्रिकेटपटू, चाहते आणि क्रिकेटच्या विश्वासाला तडा जाईल. यामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.”

काय घडले होते?

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर या सामन्याच्या आधी सराव सत्रादरम्यान रोहित व केकेआरचा प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यात काही चर्चा सुरू होती. त्यावेळी रोहित मुंबई इंडियन्स संघाबाबत बोलत असल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला. यानंतरही अखेरच्या सामन्याच्या आधी रोहित काही मित्रांसोबत बोलत असताना एक व्हिडिओ काढला जात होता. त्यावेळी रोहितने आवाज बंद करण्याचा सल्ला दिलेला.

(Rohit Sharma X Post On Cricketers Privacy)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version