Breaking News

IND vs BAN| टीम इंडियाची पुन्हा दमदार फलंदाजी, बांगलादेशसमोर 197 धावांचे आव्हान, पंड्याची दिसली पॉवर

IND vs BAN
Photo Courtesy: X/BCCI

IND vs BAN|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारताचा दुसरा सुपर 8  (Super 8) सामना बांगलादेशविरुद्ध खेळला गेला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत भारताच्या सर्वच फलंदाजांनी योगदान देत संघाला 196 पर्यंत पोहोचवले. उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नाबाद अर्धशतक झळकावले.

दोन्ही संघ सुपर 8 मधील आपला दुसरा सामना खेळत होते. बांगलादेशचा कर्णधार शांतो याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी रोहित शर्मा व विराट कोहली यांनी भारताला वेगवान सुरुवात केली. रोहितने 23 धावा केल्या. स्पर्धेत प्रथमच लयीत दिसलेल्या विराटने 28 चेंडूवर 37 धावा काढल्या. मागील दोन सामन्यात अर्थशतक झळकावलेला सूर्यकुमार यादव फक्त सहा धावांचे योगदान देऊ शकला. मधल्या फळीत पंत याने 36 तर दुबेने 34 धावा चोपल्या.

उपकर्णधार हार्दिक पंड्या याने यावेळी जबाबदारीने खेळ करत अखेरपर्यंत नाबाद राहत 27 चेंडूत 50 धावा केल्या. यामध्ये चार चौकार व तीन षटकारांचा समावेश होता. बांगलादेश संघासाठी वेगवान गोलंदाज तंझीम हसन व रिशाद होसेन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

(IND vs BAN India Post 196 In T20 World Cup 2024)

One comment

  1. Can I just say what a relief to find someone who actually knows what theyre talking about on the internet. You definitely know how to bring an issue to light and make it important. More people need to read this and understand this side of the story. I cant believe youre not more popular because you definitely have the gift.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version