Breaking News

बिग ब्रेकिंग! Steve Smith ची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती, भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी, 5800 धावा आणि…

steve smith
Photo Courtesy: X

Steve Smith Retired From ODI Cricket: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज व चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये (Champions Trophy 2025) मध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताकडून पराभूत झाल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. 

Steve Smith Retired From ODI Cricket

नियमित कर्णधार पॅट कमिन्स जखमी असल्याने स्मिथ याला या स्पर्धेसाठी कर्णधारपद देण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वात संघाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. अत्यंत युवा गोलंदाजी असताना त्याने भारतीय संघाविरुद्ध अखेरपर्यंत झुंज दिली. या पराभवानंतर त्याने आपल्या सहकाऱ्यांना आपण वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले.

आपल्या निवृत्तीबद्दल बोलताना तो म्हणाला, “संघात सध्या चांगले वातावरण आहे. आगामी वनडे विश्वचषक 2027 मध्ये होईल. त्यासाठी युवा खेळाडूंना तयार करण्याची ही योग्य वेळ आहे. मी कसोटी आणि टी20 क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध असेल. आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पुढील ध्येय आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज दौरा व इंग्लंडविरुद्ध घरची कसोटी मालिका महत्त्वाची असेल. संघासाठी अधिक योगदान देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.”

स्मिथ याने ऑस्ट्रेलियासाठी 170 वनडे सामने खेळले. यामध्ये बारा शतकांसह 5800 धावा केल्या. त्याला दोन वर्ष ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करण्याचे देखील संधी मिळाली. स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या 2015 व 2013 वनडे विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य देखील राहिला आहे.

Steve Smith Retired From ODI Cricket

Exit mobile version