
Australian Allrounder Pulled Out From IPL 2026 Auction: आयपीएल 2026 लिलाव जसा जवळ येत आहे, तसे अनेक अनुभवी खेळाडू लिलावातून माघार घेताना दिसत आहेत. लिलाव 15 दिवसांवर आला असताना आणखी एका दिग्गज अष्टपैलू खेळाडूने आगामी हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला.
Glenn Maxwell Pulled Out From IPL 2026 Auction
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू राहिलेल्या ग्लेन मॅक्सवेल याने यावर्षी लिलावात नाव न देण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने याबाबत माहिती दिली. खेळाडू व व्यक्ती म्हणून आपल्याला या स्पर्धेतून खूप काही शिकायला मिळाल्याचे त्याने म्हटले. तसेच, चाहत्यांचे व संघांचे आभार मानले.
मॅक्सवेलने दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने स्पर्धेत 141 सामने खेळताना 2819 धावा केल्या आहेत. तसेच 2014 मध्ये तो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला. यावर्षी पंजाब किंग्स संघाने त्याला करारमुक्त केले होते. लिलावातील अष्टपैलू खेळाडूंची कमतरता लक्षात घेता, त्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी अचानकपणे हा निर्णय जाहीर केला.
यापूर्वी केकेआरचा आंद्रे रसेल याने करारमुक्त झाल्यानंतर लिलावात सहभागी न होता आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तर, फाफ डू प्लेसिस व मोईन अली यांनी देखील आयपीएल न खेळता पीएसएलला प्राधान्य दिले आहे. प्लेसिस व मोईन अली यांच्यावर बोली लागण्याची शक्यता कमी होती.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Andre Russell चा धक्कादायक निर्णय! अचानक घेतली IPL मधून निवृत्ती