Breaking News

चालू दौऱ्यात भारतीय संघातून बाजूला झाला Ruturaj Gaikwad, अचानक घेतला नवा निर्णय

RUTURAJ GAIKWAD
Photo Courtesy: X/BCCI

Ruturaj Gaikwad Contract With Yorkshire: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने मोठा निर्णय घेतला आहे. इंडिया ए संघासह इंग्लंड दौऱ्यावर गेलेला ऋतुराज आता यॉर्कशायर काऊंटी (Yorkshire County) क्लबसाठी खेळताना दिसेल. इंडिया ए संघात संधी न मिळाल्याने त्याने हा मार्ग स्वीकारला आहे. 

Ruturaj Gaikwad Contracted With Yorkshire County

ऋतुराज याची इंग्लंड दौऱ्यासाठीच्या इंडिया ए संघात निवड झाली होती. मात्र, त्याला दोन्ही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज 22 जून पासून सुरु होणाऱ्या सामन्यात सरे संघाविरुद्ध खेळेल. त्यानंतर तो वनडे स्पर्धेतील सर्व सामने खेळणार आहे. हा करार संपूर्ण हंगामासाठी असेल.

ऋतुराज आयपीएल दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर इंडिया ए संघात त्याची निवड झालेली. मात्र, अभिमन्यू ईस्वरन व यशस्वी जयस्वाल संघाचा भाग असल्याने त्याला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तर, दुसऱ्या सामन्यात केएल राहुल संघात आल्याने सलामीवीर म्हणून त्याने डावाची सुरुवात केली. या दोन्ही सामन्यात ऋतुराजला खेळवण्यात आले नव्हते.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

Ruturaj Gaikwad Contracted With Yorkshire County

निवृत्तीच्या 5 वर्षानंतर MS Dhoni बाबत आयसीसीचा मोठा निर्णय, नक्की काय झालं?

Exit mobile version