Breaking News

अखेर अफगाणिस्तानची स्वप्नवत घौडदौड थांबली! दक्षिण आफ्रिका T20 World Cup 2024 फायनलमध्ये, इतिहासात प्रथमच

t20 world cup 2024
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका विरूद्ध अफगाणिस्तान (SA vs AFG) असा खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी मिळालेले 57 धावांचे आव्हान सहज पार करत अंतिम फेरीत (T20 World Cup 2024 Final) प्रवेश केला. यासह दक्षिण आफ्रिका प्रथमच टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे. तर, अफगाणिस्तानची या स्पर्धेतील स्वप्नवत घोडदौड थांबली.

त्रिनिदाद येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पूर्णतः चुकीचा ठरवला. पहिल्याच षटकातच जेन्सन याने गुरबाजला बाद करत चांगली सुरुवात केली. जेन्सन, रबाडा व नॉर्किए या तिकडेने केवळ 28 धावांमध्ये अफगाणिस्तानचे 6 फलंदाज तंबूत पाठवले. फिरकीपटू तबरेझ शम्सीने अखेरचे तीन फलंदाज बाद करत अफगाणिस्तानचा डाव केवळ 56 धावांवर गुंडाळला. विशेष म्हणजे अफगाणिस्तानकडून सर्वाधिक धावसंख्या 10 राहिली. तर, अवांतर धावा 13 मिळाल्या.

विजयासाठी मिळालेल्या 57 धावांचा पाठलाग करताना डी कॉक दुसऱ्याच षटकात माघारी परतला. मात्र, फलंदाजांना अवघड असलेल्या या खेळपट्टीवर रिझा हेन्ड्रिक्स व कर्णधार ऐडन मार्करम यांनी संयम दाखवत नवव्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.

या विजयासह दक्षिण आफ्रिका प्रथमच कोणत्याही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळेल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंड समोरासमोर येणार आहेत.

(South Africa Entered In T20 World Cup 2024 Final)

8 comments

  1. I have learn a few excellent stuff here. Certainly price bookmarking for revisiting. I surprise how much effort you place to create the sort of magnificent informative website.

  2. Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  3. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  4. Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

  5. I like this site its a master peace ! Glad I found this on google .

  6. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

  7. It is best to take part in a contest for top-of-the-line blogs on the web. I’ll advocate this site!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version