Breaking News

इंग्लंडकडून ‘दुगना लगान’ वसूल करत टीम इंडिया फायनलमध्ये! T20 World Cup 2024 अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचे आव्हान

T20 world cup 2024
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) असा खेळला गेला. गयाना येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.

मागील विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भिडलेल्या या दोन संघातील नाणेफेक इंग्लंडने आपल्या नावे केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा त्यांचा निर्णय लवकर योग्य ठरला. विराट कोहली (9) व रिषभ पंत (4) हे लवकर बाद झाले. त्यानंतर मात्र कर्णधार रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पावसाचा व्यत्यय आल्यानंतरही त्यांनी आपला संयम राखत 83 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ‌

रोहितने यादरम्यान स्पर्धेतील आपले तिसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 39 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. तर दुसरीकडे सूर्यकुमारने 36 चेंडूंमध्ये 47 धावांचे योगदान दिले. त्यानंतर हार्दिक पंड्या 23 व जडेजा नाबाद 17 धावा करत संघाला 170 पर्यंत पोहोचवले. इंग्लंडसाठी जॉर्डनने तीन बळी मिळवले.

171 धावांची आव्हान पार करताना इंग्लंडला चांगली सुरुवात मिळाली. जोस बटलरने 3 षटकात 26 धावा केल्या. मात्र, चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर अक्षर पटेलने त्याला बाद केले. पुढच्या षटकात फिल सॉल्ट हा बुमराहच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. जॉनी बेअरस्टो हा देखील खाते खोलू शकला नाही. तर मोईन अलीने 8 व करनने 2 धावांचे योगदान दिले.

(India Entered In T20 World Cup 2024 Final)

8 comments

  1. Definitely, what a fantastic website and illuminating posts, I will bookmark your website.Best Regards!

  2. I am happy that I noticed this web site, precisely the right info that I was searching for! .

  3. Good post and straight to the point. I don’t know if this is in fact the best place to ask but do you folks have any thoughts on where to hire some professional writers? Thx 🙂

  4. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  5. Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  6. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  7. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  8. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version