Breaking News

टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहितचे पाणावले डोळे, भावूक क्षण कॅमेरात कैद – Video

India into T20 World Cup 2024 Final : गुरुवारी (27 जून) वेस्ट इंडिजच्या प्रोव्हिनन्स स्टेडियमवर टी20 विश्वचषक 2024 चा दुसरा उपांत्य सामना (IND vs ENG Semi Final) झाला. या सामन्यात अपराजित भारतीय संघाने मागील पराभवाचा वचपा काढत इंग्लंडला 68 धावांनी पराभूत केले. या शानदार विजयासह मानाने भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. आता भारतीय संघ टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. या अप्रतिम कामगिरीमुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे डोळे आनंदाश्रूंनी भरुन आले. 

पावसाच्या व्यत्ययामुळे भारत विरुद्ध इंग्लंड सामना सुरू व्हायला उशीर झाला. परंतु 250 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेमुळे सामना पूर्ण होऊ शकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारीत 20 षटकांत 7 बाद 171 धावा केल्या. या डावादरम्यान रोहितने पुन्हा एकदा कर्णधार खेळी करत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवनेही 47 धावा जोडल्या. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाज अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघ्यावर आणले. दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स काढल्या. तसेच जसप्रीत बुमराहने 2 फलंदाजांना बाद करत इंग्लंडला 16.4 षटकांतच 10३ धावांवर रोखले आणि सामना खिशात घातला.

भारतीय संघाच्या या लाजवाब प्रदर्शनानंतर कर्णधार रोहितचे डोळे पाणावले. अंतिम सामन्यात पोहोचल्याचा आनंद साजरा केल्यानंतर रोहित ड्रेसिंग रूमच्या बाहेर एका खुर्चीवर एकटा बसून भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीने त्याच्या हातावर कौतुकाची थाप देत त्याचे सांत्वन केले. त्यानंतर अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादवही त्याला सांत्वन देताना दिसले. रोहितचा हा डोळे पाणावलेला क्षण कॅमेरात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता भारतीय संघाला 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 विश्वषकाचा अंतिम सामना खेळायचा आहे.

4 comments

  1. Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

  2. Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  3. Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

  4. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version