Breaking News

T20 World Cup 2024| अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जय, नेदरलँड्सच्या पराभवाने इंग्लंड सुपर 8 मध्ये, स्टॉयनिस ठरला संकटमोचक

T20 World Cup 2024
Photo Courtesy: X/ICC

T20 World 2024| टी20 विश्वचषकात रविवारी (15 जून) दोन महत्त्वपूर्ण सामने खेळले गेले. ब गटातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा (ENG vs NAM) पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड (AUS vs SCO) अशा झालेल्या सामन्यात स्कॉटलंड संघाने ऑस्ट्रेलियाला अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र, निर्णायक क्षणी मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) व टीम डेव्हिड यांनी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या पराभवामुळे स्कॉटलंड संघाची सुपर 8 मध्ये जाण्याचा संधी हुकली. या गटातून ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांनी सुपर 8 मध्ये जागा बनवली.

ऍंटिगा येथे झालेला इंग्लंड विरुद्ध नामिबिया हा सामना पावसामुळे प्रत्येकी 10 षटकांचा करण्यात आला. फिल सॉल्ट व जोस बटलर ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाल्यामुळे इंग्लंडवर दडपण आले होते. जॉनी बेअरस्टोने 18 चेंडूवर 31 व हॅरी ब्रूकने 20 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा करत संघाला मजबूत बनवले. त्यांना अली व लिविंगस्टोन यांनी साथ दिली. यामुळे इंग्लंड संघ 122 पर्यंत मजल मारू शकला.

या धावांचा पाठलाग करताना नामीबिया संघ आक्रमक सुरुवात करू शकला नाही. लिंगेन व डावीन यांनी संथ फलंदाजी केल्यानंतर अनुभवी डेव्हिड विझे याने 12 चेंडूंमध्ये 27 धावा केल्या. मात्र, अखेरीस नामिबिया संघाला 41 धावांनी पराभव पत्करावा लागला.

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघासमोर स्कॉटलंडचे आव्हान होते. सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी स्कॉटलंड संघाला हा सामना जिंकावा लागणार होता. सलामीवीर जॉर्ज ‌मन्सी याने 35 धावा करत चांगली सुरुवात केली. अष्टपैलू ब्रेंडन मॅकम्युलन याने अवघ्या 34 चेंडूमध्ये 60 धावा करत ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी गोलंदाजांचा समाचार घेतला. कर्णधार बेरिंग्टन याने नाबाद 42 धावा करत आपल्या संघाला 180 अशी मोठी मजल मारून दिली.

या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने आपले पहिले तीन फलंदाज 9 व्या षटकात अवघ्या 60 धावांवर गमावले होते. मात्र, ट्रेविस हेड याने 49 चेंडूत 68 धावा काढल्या. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस याने 29 चेंडूत 59 धावांचा तडाखा दिला. टीम डेव्हिडने नाबाद 24 धावा करत ऑस्ट्रेलियाला दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे इंग्लंडने आरामात सुपर 8 फेरी गाठली.

(T20 World Cup 2024 Australia And England Won Last League Matches Scotland Out Of Super 8)

10 comments

  1. I couldn’t resist commenting

  2. Only a smiling visitor here to share the love (:, btw outstanding layout. “Reading well is one of the great pleasures that solitude can afford you.” by Harold Bloom.

  3. I dugg some of you post as I thought they were handy handy

  4. Enjoyed reading this, very good stuff, regards.

  5. I’ve read a few excellent stuff here. Definitely price bookmarking for revisiting. I wonder how much effort you set to create the sort of magnificent informative site.

  6. Hmm is anyone else experiencing problems with the pictures on this blog loading? I’m trying to determine if its a problem on my end or if it’s the blog. Any feed-back would be greatly appreciated.

  7. Just wanna input on few general things, The website layout is perfect, the articles is really excellent. “In business school classrooms they construct wonderful models of a nonworld.” by Peter Drucker.

  8. Great post. I was checking constantly this blog and I’m impressed! Very useful information particularly the last part 🙂 I care for such info much. I was looking for this particular information for a very long time. Thank you and best of luck.

  9. Its great as your other posts : D, regards for putting up. “Slump I ain’t in no slump… I just ain’t hitting.” by Yogi Berra.

  10. I like this blog its a master peace ! Glad I noticed this on google .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version