Breaking News

एकदम कडक! पहिल्या षटकात 4,4,4 मारत विराटने दाखवला क्लास, पाहा व्हिडिओ

t20 world cup final
Photo Courtesy: X

T20 World Cup 2024 Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) आमने सामने आले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पावर प्लेमध्येच तीन गडी गमावले. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) याने पहिल्या षटकात तीन शानदार चौकार लगावत मने जिंकली.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या भारतासाठी विराटने सुंदर सुरुवात करून दिली. मार्को जेन्सन याने टाकलेल्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइक मिळाल्यावर त्याने पॉईंटच्या दिशेने चौकार वसूल केला. जेन्सनने पुढील चेंडू पायावर टाकल्यानंतर त्याने शानदार फ्लिक करत आणखी चार धावा मिळवल्या. याच षटकातील अखेरचा चेंडूवर विराटने स्ट्रेट ड्राईव्ह मारत भारताला पहिल्या षटकात 15 धावा मिळवून दिल्या.

विराटला या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याची सर्वाधिक धावसंख्या 37 राहिली. तो तीन सामन्यात दुहेरी धावसंख्या देखील गाठू शकला नाही.

(Virat Kohli 3 Fours In First Over Of T20 World Cup 2024 Final)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version