Breaking News

लागा तयारीला! Olympics 2036 चे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंना सरकार देतेय लाखो, वाचा सविस्तर

olympics 2036
Photo Courtesy: X

Indian Government Preparing For Olympics 2036: भारताचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भारतातील युवा व उदयोन्मुख खेळाडूंसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. ऑलिंपिक्स 2036 च्या दृष्टीने भारत सरकार तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी खेळाडूंचा उत्साह वाढवण्याकरिता भारत सरकार करत असलेल्या रणनीतीबाबत देखील त्यांनी माहिती दिली.

Indian Government Preparing For Olympics 2036

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेतील भारतीय संघाच्या सन्मान समारंभात ते बोलत होते. यावेळी बोलताना शहा म्हणाले, “भारत सरकार ऑलिंपिक्स 2036 च्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहे. या स्पर्धेसाठी तयारी करत असलेल्या तब्बल 3000 खेळाडूंना टॉप्स मोहिमेंतर्गत भारत सरकारकडून दरमहा 50,000 इतकी प्रोत्साहनपर रक्कम दिली जात आहे. आम्हाला विश्वास आहे की भारत या स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या पहिल्या पाच देशांमध्ये असेल.”

भारत ऑलिंपिक्स 2036 च्या यजमानपदासाठी उत्सुक आहे. तत्पूर्वी राष्ट्रकुल स्पर्धा आणि एशियन गेम्सदेखील भारत आयोजित करू शकतो. नुकतेच भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा धोरण देखील जाहीर केले आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Ruturaj Gaikwad ने सोडला संघ, तडकाफडकी घेतला निर्णय, 22 जुलैला…

Exit mobile version