Breaking News

Viv Richards : सूर्यकुमार यादवचा सन्मान, रिषभला नवं टोपणनाव; विव रिचर्ड्सची भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये एन्ट्री

Vivian Richards In Indian Dressing Room : भारताने शनिवारी (22 जून) बांगलादेशविरुद्धचा सुपर 8 सामना 50 धावांनी जिंकत उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचे वातावरण होते. क्रिकेटजगतातील दिग्गज फलंदाज विव रिचर्ड्स (Viv Richards) यांनीही भारतीय संघाच्या या जल्लोषात सहभाग नोंदवला. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर वेस्ट इंडिजचे दिग्गज रिचर्ड्स यांनी ड्रेसिम रूममध्ये जात भारतीय खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. 

रिचर्ड्स यांनी भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर सर्वप्रथम विराट कोहलीची भेट घेतली. यानंतर त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडशी हस्तांदोलन केले. मग त्यांनी बांगलादेशविरुद्ध सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला सन्मानित करण्याचे मोठे काम केले. खरे तर रिचर्ड्स यांना खास सूर्यकुमारचा सन्मान करण्यासाठी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये बोलावण्यात आले होते.

खरे तर, प्रत्येक सामन्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला मेडल देण्याची परंपरा भारतीय संघाने सुरू केली आहे. या परंपरेचा एक भाग म्हणून, विव रिचर्ड्सला विजेत्या खेळाडूला मेडल देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदकासाठी अनेक दावेदार होते, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त अक्षर पटेल आणि रोहित शर्माचे नाव होते. पण, शेवटी सूर्यकुमार यादवची विजेता म्हणून निवड झाली.

विव रिचर्ड्स यांनी सूर्यकुमार यादवला दिले मेडल
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये फील्डर ऑफ द मॅचच्या विजेत्याची घोषणा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी केली. विजेत्या सूर्यकुमार यादवने मेडल स्विकारण्यापूर्वी  रिचर्ड्स यांना मिठी मारली आणि नंतर मेडल स्विकारले. भारतीय ड्रेसिंग रुममध्ये रिचर्ड्स यांनी सूर्यकुमार यादवचा केवळ सन्मानच केला नाही तर रिषभ पंतला एक नवीन नावही दिले. त्यांनी पंतला पॉकेट रॉकेट म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version