Breaking News

हे खरं टॅलेंट! Arshin Kulkarni ने 9 चेंडूत दाखवली धोनी,‌ विराट अन पंड्याची झलक, पाहा व्हिडिओ

arshin kulkarni
Photo Courtesy; Instagram

Arshin Kulkarni 3 Sixes: महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) मध्ये शनिवारी (7 जून) ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) विरुद्ध सातारा वॉरियर्स (ENT v SW) असा सामना खेळला गेला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने 8 गडी राखून विजय मिळवला. मात्र, नाशिक संघाचा सलामीवीर अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) याने केवळ 9 चेंडू खेळताना तीन भारतीय दिग्गजांच्या फलंदाजीची झलक दाखवली. 

Arshin Kulkarni 3 Sixes In MPL 2025

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात सातारा वॉरियर्सने 15 षटकात 116 धावा बनवलेल्या. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने ईगल नाशिक टायटन्सला 5 षटकांत 54 भावांचे आव्हान दिले गेले. नाशिक संघाने 4.3 षटकात हे आव्हान पार करत विजय संपादन केला. या धावांचा पाठलाग करताना सलामीला उतरलेल्या अर्शिन कुलकर्णी याला 9 चेंडूंचा सामना करण्यास मिळाला. त्याने 19 धावा करताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

अर्शिन याने केवळ 19 धावा केल्या असल्या तरी त्यामध्ये तीन षटकार लगावले होते. त्याने लगावलेला पहिला षटकार विराट कोहलीची झलक दाखवणार होता. आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याने शॉर्ट आर्म पुलचा नेत्रदीपक फटका खेळला. त्यानंतर दुसरा षटकार मारताना त्याने हार्दिक पंड्याप्रमाणे उजव्या यष्टी बाहेरील चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिला. तर, अखेरचा षटकार त्याने एमएस धोनी याच्याप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट मारत लगावला. त्याच्या या तीन षटकारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

अर्शिन कुलकर्णी हा एमपीएल 2023 मध्ये शतक झळकावल्यानंतर चर्चेत आला होता‌. त्यानंतर भारताच्या अंडर 19 संघाचे त्याने विश्वचषकात प्रतिनिधित्व केले. मागील दोन हंगामापासून अर्शिन आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग आहे.

(Arshin Kulkarni Hit 3 Sixes)

हे देखील वाचा: लखपती बनायचंय का? MPL 2025 पाहायला जा, वाचा सविस्तर

Exit mobile version