
Ruturaj Gaikwad Selected For INDvSA ODI Series: आगामी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत ऋतुराज गायकवाड हा भारतीय संघात पुनरागमान करेल. तसेच, नियमित कर्णधार शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने अनुभवी केएल राहुल (KL Rahul ) याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Ruturaj Gaikwad Selected For INDvSA ODI Series
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गिल कोलकाता कसोटीत दुखापतग्रस्त झाल्याने या मालिकेत खेळणार नाही हे यापूर्वीच सांगण्यात आलेले. त्यामुळे निवड समितीने अंतरिम कर्णधार म्हणून राहुलला पसंती दिली. अनुभवी रोहित शर्मा व विराट कोहली हे पुन्हा एकदा भारताच्या जर्सीमध्ये दिसतील.
वनडे संघात रवींद्र जडेजा हा देखील पुनरागमन करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याचा विचार केला गेला नव्हता. तर, अक्षर पटेल हा आपली जागा बनवण्यात अपयशी ठरला. जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिल्याचे दिसून येत आहे. तर, तिलक वर्मा हा चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे. उभय संघांमध्ये 30 नोव्हेंबरपासून वनडे मालिका खेळली जाईल.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), रिषभ पंत, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग व ध्रुव जुरेल
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: दोन तास शिल्लक असतानाच Smriti Mandhana चा विवाहसोहळा पुढे ढकलला, कारण धक्कादायक
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।