
Smriti Mandhana Marriage Postponed: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीचा विवाह सोहळा 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी होणार होता. मात्र, आता हा विवाहसोहळा पुढे ढकलला गेल्याचे सांगितले जात आहे. स्मृतीचे वडिल श्रीनिवास (Smriti Mandhana Father) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हा निर्णय घेण्यात आला.
Smriti Mandhana Marriage Postponed
सांगली येथे स्मृती आणि गायक-संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या लग्नाचे कार्यक्रम मागील चार दिवसांपासून सुरू आहे. हळद, मेहंदी व संगीताच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यानंतर रविवारी (23 नोव्हेंबर) सायंकाळी या दोघांचा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, सकाळी नाश्त्याच्या वेळी स्मृतीचे वडिल श्रीनिवास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना सांगलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले गेले.
स्मृती व तिच्या वडिलांचे नाते अत्यंत घट्ट असल्याने, ते पूर्णतः बरे होईपर्यंत विवाह सोहळा होणार नसल्याचे, स्मृतीच्या मॅनेजरने स्पष्ट केले. तसेच, कुटुंबाची प्रायव्हसी जपण्याची देखील आवाहन यावेळी करण्यात आले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: हेडच्या शतकी तडाख्याने ऑस्ट्रेलियाची Ashes 2025-2026 मध्ये विजयी सुरुवात, पर्थ कसोटी दुसऱ्याच दिवशी निकाली
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।