Breaking News

उलटफेरांची US Open 2024: अल्कारेझपाठोपाठ जोकोविचचेही पॅकअप, 22 वर्षांनी पहिल्यांदाच घडतंय हे

US OPEN 2024
Photo Courtesy: X/Novak Djokovic

US Open 2024: वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन (US Open 2024) मध्ये पुरूष एकेरीतील धक्कादायक मालिका सुरूच आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याच्या पाठोपाठ आता सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम विजेता नोवाक जोकोविच (Novak Djokovic) हादेखील पराभूत होत बाहेर पडला आहे.

यापूर्वी वर्षात फ्रेंच ओपन व विंबल्डन जिंकलेला अल्कारेझ दुसऱ्या फेरीत बिगर मानांकित खेळाडूकडून पराभूत झाला. त्यामुळे ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता व आत्तापर्यंत तब्बल 23 ग्रँड स्लॅम जिंकलेल्या जोकोविच याच्याकडे विजयाची सुवर्णसंधी होती. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्सी पोपीरीन (Alexei Popyrin) याने त्याचे स्वप्न धुळीस मिळवले. अठ्ठावीसव्या मानांकित पोपीरीन याने त्याला चार सेटपर्यंत चाललेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात 6-4,6-4,2-6,6-4 असे पराभूत केले.‌

यासह जोकोविच 2017 नंतर प्रथमच एका वर्षात कोणतेही ग्रँडस्लॅम जिंकण्यात अपयश ठरली. तसेच, 2002 नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा रॉजर फेडरर, राफेल नदाल व नोवाक जोकोविच यांच्यापैकी एकानेही एका वर्षात कोणतेही ग्रॅंडस्लॅम जिंकलेले नाही.

(Novak Djokovic Out Of US Open 2024)

Exit mobile version