Breaking News

बॅझबॉल खेळत इंग्लंडने मारली Headingley Test, टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, 371 धावांचा केला यशस्वी पाठलाग

HEADINGLEY TEST
Photo Courtesy; X

ENG vs IND Headingley Test: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील हेडिंग्ले कसोटी पाचव्या दिवशी समाप्त झाली. चौथ्या डावात विजयासाठी मिळालेल्या 371 धावांचा यशस्वी पाठलाग करत, यजमान इंग्लंडने सामना खिशात घातला. यासह त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 

ENG vs IND Headingley Test Won By England

पहिल्या चार दिवशी बरोबरीचा सामना झाल्यानंतर पाचव्या दिवशी इंग्लंडला 350 धावांची गरज होती. पहिल्या सत्रातच बेन डकेट व झॅक क्राऊली या दोन्ही सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना संधी दिली नाही. दोघांनी या सत्रात 97 धावा जोडल्या. यादरम्यान त्यांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाल्यानंतर डकेट याने अधिकच आक्रमक धोरण स्वीकारत आपले शतक पूर्ण केले. इंग्लंड संघ 371 धावांकडे यशस्वीरीत्या वाटचाल करत असताना, पावसाने सामन्यात व्यत्यय आणला.

याचा फायदा घेत पुन्हा खेळ सुरू झाल्यावर प्रसिद्ध कृष्णाने क्राऊलीला बाद केले. त्याने 65 धावा केल्या. पहिल्या गड्यासाठी डकेट व क्राऊली जोडीने तब्बल 188 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पहिला डावातील शतकवीर ओली पोप हा देखील फक्त आठ धावा बनवून, कृष्णाचा बळी ठरला. तिसऱ्या विकेटसाठी डकेट व जो रुट ज्यांनी 47 धावांची भागीदारी बनवली असताना, शार्दुल ठाकूर गोलंदाजीला आला. त्याने डकेट याला वैयक्तिक 149 धावांवर बाद केले. तर, पुढच्या चेंडूवर हॅरी ब्रूकला खातेही न खोलू देता तंबूचा रस्ता दाखवला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

भारतीय संघ पुनरागमन करायला असे वाटत असतानाच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने आक्रमक फटके मारले. चहापानाला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडला अखेरच्या सत्रात 102 धावांची आवश्यकता होती. मात्र, स्टोक्सने एका बाजूने आक्रमण सुरू ठेवत इंग्लंडला 300 पार पोहोचवले. तो 33 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या जेमी स्मिथ याने त्याचाच कित्ता गिरवत इंग्लंड दबावात येणार नाही हे दाखवून दिले.

स्मिथ आक्रमक खेळत असताना जो रूट याने आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर जडेजाच्या एकाच षटकात 18 धावा फटकावत स्मिथ याने इंग्लंडचा विजय साकार केला. रूट 53 तर स्मिथ 44 धावांवर नाबाद राहिला. पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकणारा बेन डकेट (Ben Duckett) सामनावीर ठरला.

 हे देखील वाचा: 

 ENG vs IND Headingley Test: पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे निर्विवाद वर्चस्व, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट

ENG vs IND Headingley Test: पोपच्या शतकाने इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Headingley Test: टीम इंडियाची सामन्यावर मजबूत पकड, वाचा Day 3 च्या हायलाईट्स

ENG vs IND Headingley Test Day 4: चौथा दिवस पंत-राहुलचा, वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स

Exit mobile version