Breaking News

भारतीय क्रिकेटवर शोककळा! माजी क्रिकेटपटू Dilip Doshi यांचे निधन, 32 व्या वर्षी डेब्यू पण गाजवली मैदाने

DILIP DOSHI
Photo Courtesy: X

Former Indian Cricketer Dilip Doshi Passed Away: भारतीय क्रिकेटविश्वासाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे. भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे लंडन येथे निधन झाले असून, ते 77 वर्षांचे होते. वयाच्या 32 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करून देखील त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवले होते. 

Former Indian Cricketer Dilip Doshi Passed Away

दोशी यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या निधनाचे वृत्त दिले गेले. यानंतर बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष निरंजन शहा व गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या जयदेव शहा यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दिलीप दोशी यांनी वयाच्या 32 व्या वर्षी भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. त्यानंतर देखील त्यांनी भारतासाठी 33 कसोटी सामन खेळताना 114 मिळवले. तर, 15 वनडे सामन्यांमध्ये त्यांच्या नावे 22 बळी आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे तब्बल 898 बळी जमा असलेले दिसतात. दोशी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल व सौराष्ट्र यांचे प्रतिनिधित्व केले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND Headingley Test Day 4: चौथा दिवस पंत-राहुलचा, वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स

Exit mobile version