Breaking News

ENG vs IND Headingley Test Day 4: चौथा दिवस पंत-राहुलचा, वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind
Photo Courtesy X

ENG vs IND Headingley Test Day 4 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या दरम्यानच्या पहिल्या हेडिंग्ले कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाकडे अद्याप 350 धावांची आघाडी असून, पाचव्या दिवशी इंग्लंड या धावांचा पाठलाग करेल. भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत व अनुभवी केएल राहुल यांची शतके चौथ्या दिवशीचे वैशिष्ट्य राहिले.

ENG vs IND Headingley Test Day 4 Highlights

– भारतीय संघाने 2 बाद 90 वरून सुरू केला डाव

– चौथ्या दिवशी केवळ दोन धावांची भर घालून शुबमन गिल बाद

– गोलंदाजांना मदत करणाऱ्या वातावरणात केएल राहुल व रिषभ पंत यांची सावध फलंदाजी

– केएल राहुलने यादरम्यान पूर्ण केले अर्धशतक

– लंचपर्यंत भारताने 3 बाद 153 अशी सावध मजल मारली

– दुसऱ्या सत्रात राहुल व पंत यांची आक्रमक सुरुवात

– पंतने पूर्ण केले अर्धशतक

– धावांचा वेग वाढवत राहुलने झळकावले कसोटी कारकिर्दीतील नववे शतक

– रिषभ पंतनेही 115 चेंडूत ठोकले शतक, एकाच कसोटीच्या दोन्ही डावात शतक ठोकणारा सहावा भारतीय बनला पंत

– बाद होण्यापूर्वी पंतने केल्या 140 चेंडूंमध्ये 118 धावा, राहुल-रिषभची 195 धावांची भागीदारी

– चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारत 4 बाद 298, दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने तब्बल 145 धावा कुटल्या

– तिसऱ्या सत्रात भारतीय संघाची घसरगुंडी

– राहुल व करूण नायरने जोडल्या 46 धावा,‌ राहुल 137 तर नायर 20 धावा काढून बाद

– शार्दुल ठाकूर चार, तर बुमराह, सिराज व प्रसिद्ध कृष्णा खातेही न खोलता तंबूत, रवींद्र जडेजा 25 धावांवर नाबाद

– भारताने केवळ 31 धावांमध्ये ‌गमावले अखेरचे सहा फलंदाज

– इंग्लंडसाठी कार्स व टंग यांचे प्रत्येकी तीन बळी

– दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड बिनबाद 21

– अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 90 षटकात 350 धावांची गरज, तर भारतीय संघाला हवे 10 बळी

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND Headingley Test: पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे निर्विवाद वर्चस्व, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट

ENG vs IND Headingley Test: पोपच्या शतकाने इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Headingley Test: टीम इंडियाची सामन्यावर मजबूत पकड, वाचा Day 3 च्या हायलाईट्स

Exit mobile version