Breaking News

Rahane-Pujara साठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद! BCCI चा मोठा निर्णय

rahane-pujara
Photo Courtesy: X

Rahane-Pujara Not Picked For Duleep Trophy: भारतातील दुसरी महत्त्वाची प्रथमश्रेणी स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी स्पर्धेसाठी पश्चिम विभागाच्या संघाची निवड झाली आहे. या संघाचे नेतृत्व मुंबईचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर हा करेल. मात्र, भारतीय संघाचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) व चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची दारे बंद झाल्याचे संकेत मिळत आहेत. 

Rahane-Pujara Not Picked For Duleep Trophy 2025

बंगळुरू येथे 29 ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. पंधरा सदस्यांच्या या संघात मुंबईचे 7 खेळाडू सामील आहेत. तर गुजरातच्या चार खेळाडूंना संधी मिळाली आहे. महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांचे प्रत्येकी दोन खेळाडू संघात दिसतील. तर, सात खेळाडूंचा राखीव खेळाडू म्हणून समावेश केला गेला आहे.

अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा हे मागील दोन वर्षापासून भारतीय संघाचा भाग नाहीत. दुलिप ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड न झाल्याने निवडसमिती त्यांच्यापुढे विचार करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मात्र, आगामी देशांतर्गत हंगामात ते आपापल्या संघांसाठी खेळताना दिसू शकतील.

दुलिप ट्रॉफी 2025 साठी पश्चिम विभागाचा संघ: शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, श्रेयस अय्यर, शम्स मुलाणी, तुषार देशपांडे, तनुष कोटीयान (मुंबई), ऋतुराज गायकवाड, सौरभ नवले (महाराष्ट्र), आर्य देसाई, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, अर्झान नागवासवाला (गुजरात), धर्मेंद्र जडेजा, हार्विक देसाई (सौराष्ट्र)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND Oval Test Day 1: नायरची एकाकी झुंज, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

Exit mobile version