Breaking News

‘गॅरी पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये’; हरभजन सिंगचा सल्ला

Harbhajan Singh On Gary Kirsten: टी20 विश्वचषक 2024 मधील निराशाजनक प्रदर्शनानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी बाबर आझमच्या संघावर सडकून टीका केली. पाकिस्तानी संघात फूट पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच, पाकिस्तान क्रिकेट संघ एकसंध नाही. आपल्या प्रदीर्घ प्रशिक्षक कारकिर्दीत कोणत्याही संघात आपण अशी परिस्थिती पाहिली नसल्याचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांनी सांगितले आहे. यावर माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने 2011 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक कर्स्टन यांना मोठा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानी संघाबाबत काय म्हणाले गॅरी कर्स्टन?
‘पाकिस्तान संघात एकता नाही. ते त्याला संघ म्हणतात, पण तो संघ नाही. संघात मोठ्या प्रमाणात दुफळी असून गटबाजी आहे. खेळाडू एकमेकांना साथ देत नाहीत. प्रत्येकजण वेगवेगळा असल्यासारखा वागतो. मी अनेक संघांसोबत काम केले आहे, पण अशी परिस्थिती कधीच पाहिलेली नाही,’ अशा तीव्र शब्दांत गॅरी कर्स्टनने टीका केल्याचे वृत्त आहे.

कर्स्टन यांच्या या वक्तव्यावर हरभजन सिंग ट्विट करत म्हणाला की, ‘गॅरी तिथे वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये… गॅरी कर्स्टन एक हिरा आहे. 2011 च्या आपल्या संघातील ते एक सर्वोत्तम प्रशिक्षक, मार्गदर्शक, मित्र आहेत. आपला 2011चा विश्वचषक विजेता प्रशिक्षक… खास व्यक्ती गॅरी…,’ असं हरभजन सिंग ट्विटमध्ये म्हणाला आहे.

6 comments

  1. obviously like your web-site but you have to test the spelling on quite a few of your posts. Several of them are rife with spelling problems and I to find it very troublesome to tell the reality on the other hand I will certainly come back again.

  2. Just wanna comment on few general things, The website layout is perfect, the subject material is really fantastic. “War is much too serious a matter to be entrusted to the military.” by Georges Clemenceau.

  3. I love your blog.. very nice colors & theme. Did you create this website yourself? Plz reply back as I’m looking to create my own blog and would like to know wheere u got this from. thanks

  4. I in addition to my pals were checking out the best recommendations found on your web page while all of a sudden came up with an awful feeling I never expressed respect to the web site owner for those tips. Those young boys are already as a result warmed to read through all of them and have extremely been taking pleasure in them. Many thanks for simply being really thoughtful and also for choosing these kinds of high-quality resources most people are really needing to understand about. My personal sincere regret for not expressing gratitude to sooner.

  5. I truly enjoy looking at on this web site, it contains superb articles. “Do what you fear, and the death of fear is certain.” by Anthony Robbins.

  6. You need to take part in a contest for probably the greatest blogs on the web. I will recommend this website!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version