Breaking News

टीम इंडियाचा T20 World Cup मध्ये दणदणीत विजयाने श्रीगणेशा! गोलंदाजांच्या कामगिरीवर रोहित-रिषभचा कळस

T20 WORLD CUP
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये सातवा सामना भारत आणि आयर्लंड (INDvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सामन्यात विजेतेपदाचा दावेदार असलेल्या भारतीय संघाने आयर्लंडवर वर्चस्व गाजवले. ‌गोलंदाजांनी आयर्लंडला केवळ 96 धावांवर रोखल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने झळकावलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने 8 गडी राखून मोठा विजय मिळवला. केवळ 6 धावांत 2 बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला.

न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अर्शदीप सिंगने तिसऱ्या षटकात आयर्लंडचे दोन्ही सलामीवीर तंबूत पाठवले. त्यानंतर हार्दिक पांड्या याने तीन तर जसप्रीत बुमराह याने दोन बळी मिळवत आयर्लंडची अवस्था खराब केली. आयर्लंडने अवघ्या 50 धावात आपले 8 गडी गमावले होते. मात्र, गॅरेथ डेलानी याने 26 व लिटल याने 14 धावा करत संघाला 96 अशी काही सन्मानजनक मजल मारून दिली.

या धावांचा पाठलाग करताना भारताला विराट कोहलीच्या रूपाने पहिला धक्का लवकर बसला. त्याने केवळ एक धाव केली. त्यानंतर मात्र रोहित शर्मा व रिषभ पंत यांनी संयम व आक्रमण यांचा दुहेरी संयम दाखवत भारताचा डाव पुढे नेला. रोहित याने यावेळी 37 चेंडूवर 4 चौकार व 3 षटकार ठोकत 52 धावा केल्या. खांद्याला चेंडू लागल्यानंतर त्याने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सूर्यकुमार यादव फक्त दोन धावा करू शकला. अखेर रिषभ याने 26 चेंडूत नाबाद 36 धावा करत संघाला विजय साकार करून दिला. भारताचा पुढील सामना 9 जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल.

(T20 World Cup 2024 India Beat Ireland By 8 Wickets Hardik Bumrah Rohit Shines)

T20 World Cup| भारतीय गोलंदाजीसमोर आयर्लंडची फलंदाजी फुस्स, केवळ 96 धावांत उडवला खुर्दा, हार्दिक-बुमराहचा दिसला दम

2 comments

  1. After all, what a great site and informative posts, I will upload inbound link – bookmark this web site? Regards, Reader.

  2. I love meeting useful info, this post has got me even more info! .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version