Breaking News

T20 World Cup| भारतीय गोलंदाजीसमोर आयर्लंडची फलंदाजी फुस्स, केवळ 96 धावांत उडवला खुर्दा, हार्दिक-बुमराहचा दिसला दम

t20 world cup
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सातवा सामना भारत आणि आयर्लंड (INDvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सर्वच गोलंदाजांनी योगदान देत आयर्लंडचा डाव केवळ 96 धावांवर संपवला.

या सामन्यातून दोन्ही संघांनी विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात केली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या आयर्लंड संघाची सुरुवात खराब झाली. अर्शदीप सिंग याने तिसऱ्या षटकात दोन्ही सलामीवीर स्टर्लिंग व बालबिर्नी यांना तंबूत पाठवले. त्यानंतर बुमराह व सिराज यांनी टेक्टर व डॉकरेल यांना बाद केले. उपकर्णधार हार्दिक पंड्या याने मधल्या षटकात तीन बळी मिळवत आयर्लंडची अवस्था 8 बाद 50 अशी केली.

अखेर जोशुआ लिटल व डेलानी यांनी काही मोठे फटके खेळत संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. लिटल याने 13 चेंडूवर 14 धावा केल्या. डेलानी याने अर्शदीपवर हल्ला चढवत 14 चेंडूवर 26 धावा केल्या. यात दोन चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. मात्र, 16 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर फ्री हिट असताना तो धावबाद झाला. भारतासाठी हार्दिक पंड्या याने सर्वाधिक तीन बळी टिपले. तर, अर्शदीप व बुमराहने दोन गडी बाद केले. फिरकीपटू अक्षर पटेल याला एक गडी बाद करण्यात यश आले.

(T20 World Cup 2024 India Restricted Ireland On 96 Hardik Pandya Took Three Wickets)

T20 World Cup| नाणेफेक जिंकून टीम इंडियाची गोलंदाजी, पाहा कोण इन कोण आऊट

3 comments

  1. Someone necessarily help to make seriously articles I would state. That is the very first time I frequented your website page and up to now? I surprised with the analysis you made to make this particular publish incredible. Excellent task!

  2. Nice post. I learn something more challenging on different blogs everyday. It will always be stimulating to read content from other writers and practice a little something from their store. I’d prefer to use some with the content on my blog whether you don’t mind. Natually I’ll give you a link on your web blog. Thanks for sharing.

  3. Greetings! I’ve been following your blog for a while now and finally got the courage to go ahead and give you a shout out from Austin Tx! Just wanted to mention keep up the good work!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version