Breaking News

एकाच इनिंगमध्ये हिटमॅन Rohit Sharma चा फाईव्ह स्टार धमाका! नावे केले पाच मोठे रेकॉर्ड

Rohit Sharma
Photo Courtesy: X/BCCI

Rohit Sharma Records|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्धशतक झळकावले. आपल्या या खेळी दरम्यान त्याने पाच नवे विक्रम देखील आपल्या नावे केले.

न्यूयॉर्क येथे झालेल्या या सामन्यात भारताला विजयासाठी फक्त 97 धावांचे आव्हान मिळाले होते. कर्णधार रोहित शर्मा याने याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत शानदार अर्धशतक झळकावले. रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी त्याने 37 चेंडूंमध्ये 52 धावांची खेळी यामध्ये चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.‌

रोहितने या खेळी दरम्यान टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा केवळ दुसरा फलंदाज ठरला. तसेच, सर्वात कमी चेंडूत 4000 भावा बनवण्याचा विक्रमही त्याच्या नावावर नोंदला गेला. याबरोबरच विराट कोहलीनंतर त्याने टी20 विश्वचषकात 1000 धावा देखील पूर्ण केल्या (Rohit Sharma Runs). रोहितने यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 600 षटकार पूर्ण केले. तर, मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धांमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय बनला (Rohit Sharma Sixes).

भारतीय संघाच्या या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, भारताच्या सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी ‌करत आयर्लंड संघाला फक्त 96 धावांवर रोखले होते. हार्दिक पंड्या याने तीन तर अर्शदीप व बुमराहने प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा याने 52 तर रिषभ पंतने नाबाद 36 धावा केल्या. भारताने केवळ दोन गडी गमावत हा सामना आपल्या नावे केला. जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला.

(Rohit Sharma Made Five New Records Against Ireland In T20 World Cup 2024)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version