Breaking News

VIDEO| सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय ‘हा’ कॅच, लोक म्हणाले, ‘क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम’, Abhishek Das Catch

abhishek das catch
Photo Courtesy: X/Fancode

Abhishek Das Catch|सध्या कोलकाता येथे बंगाल प्रो टी20 लीग (Bengal Pro T20 League) ही स्पर्धा खेळली जात आहे. आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) यांनी प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केले. मात्र, स्पर्धेतील सातव्या सामन्यात एक शानदार झेल घेतल्याने ही स्पर्धा चर्चेत आली आहे. बंगालचा युवा क्रिकेटपटू अभिषेक दास (Abhishek Das) याने हा झेल घेतला.

शुक्रवारी (14 जून) रेशमी मेदिनापूर विझार्ड्स व आदमस हावडा वॉरियर्स यांच्यातील सामन्यात हा झेल पकडला गेला. दिपक महातो याला बाद करताना अभिषेक याने लॉन्ग ऑनवर हा झेल टिपला. या सामन्यात वॉरियर संघाने विजय मिळवला.

अनेक जण हा भारतीय क्रिकेटमधील आजवरचा सर्वोत्तम  झेल असल्याचे म्हणत आहेत. तसेच काहींनी या झेलाची तुलना बेन स्टोक्स याने 2019 विश्वचषकात टिपलेल्या झेलाशी (Ben Stokes 2019 World Cup Catch) केली आहे. स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा अविश्वसनीय झेल टिपला होता.

(Abhishek Das Catch In Bengal Pro T20 League Goes Viral)

Trent Boult : “हा माझा शेवटचा टी20 विश्वचषक असेल”, न्यूझीलंडच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर ट्रेंट बोल्टचा धक्कादायक निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version